बॉलिवूडचा ही-मॅन काळाच्या पडद्याआड; धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहचली सिनेसृष्टी

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक दशकं आपल्या अभिनयाने अमीट ठसा उमटवणारे दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत सुधारल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते, मात्र आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.


धर्मेंद्र यांच्या घराबाहेर चाहत्यांची वर्दळ वाढली. त्यांच्या प्रकृतीची माहिती सतत घेत असलेले बॉलिवूडमधील अनेक कलाकारही त्यांच्या भेटीसाठी धावले होते. निधनाची बातमी बाहेर आल्यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे थेट विलेपार्ले येथील स्मशानभूमीकडे रवाना झाले. हेमा मालिनी देखील स्मशानभूमीत पोहोचल्या असून कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्काराची तयारी करताना दिसले.


सिनेसृष्टीत 'ही-मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रवासात ३०० पेक्षा अधिक चित्रपटांत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विविध भूमिकांमधील त्यांचा सहज अभिनय, अ‍ॅक्शन-हिरोची प्रतिमा आणि रोमँटिक persona यामुळे ते आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. याच दरम्यान, आमिर खान देखील श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्मशानभूमीकडे रवाना झाल्याचे पाहायला मिळाले आहे.


चित्रपट निर्माता करण जोहर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत धर्मेंद्र यांच्या जाण्याने “एका युगाचा अंत” झाल्याची भावना व्यक्त केली आहे.


रुग्णालयातून घरी आल्यानंतर स्वतः गाडी चालवत अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांची भेट घेतली होती. दोघांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असल्याने त्यांच्यातील जवळीक विशेष होती. अभिनयासोबतच धर्मेंद्र यांनी राजकारणातही सक्रिय भूमिका बजावली होती.


धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनीही मोठ्या संख्येने स्मशानभूमीकडे धाव घेतली असून आपल्या आवडत्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी होत आहे.

Comments
Add Comment

Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ अभियानांतर्गत दहिवडी व वडूज येथे तिरंगा रॅली

दहिवडी / वडूज : ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या राष्ट्रभक्तीपर अभियानांतर्गत दहिवडी आणि वडूज येथे तिरंगा रॅलीचे

Government Officers : बदलीनंतरही शासकीय घर न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा भत्ता रोखणार

- राज्य सरकारचा निर्णय; नवीन नियमावली तात्काळ प्रभावाने लागू मुंबई : बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून बदली

Water Resources Department : धरणांच्या काठी पर्यटनाला येणार नवा बहर

- 'जलसंपदा' आणि 'पर्यटन' विभागाचा संयुक्त उपक्रम; जायकवाडी, कोयना, उजनीसह १० प्रमुख धरणांचा समावेश मुंबई : अथांग

MLA Sangram Jagtap : टिळा लावल्यामुळेच धर्मांध शक्तींकडून धीरज परदेशीची हत्या

- आमदार संग्राम जगताप; तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलिसांचा प्रयत्न मुंबई : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत

Lok Adalat : राज्यात १ सप्टेंबरपासून 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत', महसूलमंत्र्यांची घोषणा; पुणे पॅटर्नच्या यशांनंतर राज्यव्यापी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये

FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परि