पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड किल्ला बंद राहणार आहे. कारण, जानेवारी २०२६ मध्ये पुण्यात 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६' ही सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुधारण्याचे काम महापालिकेने हाती घेतल्यामुळे सिंहगड मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सिंहगड घाटमार्गावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
'पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६' या सायकल स्पर्धेमध्ये अनेक देशांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे स्पर्धा ज्या मार्गाने सुरू होणार आणि संपणार त्या मार्गावर रस्ते डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती यासह अन्य सुधारणांसाठी महापालिकेच्या वतीने १४५ कोटी ७५ लाख ८० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या दुरूस्ती कामासाठी सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या काळात बंद राहणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डोणजे गोळेवाडी टोलनाका ते सिंहगड घाटातील कोंढणपूर टोलनाका आणि अवसरेवाडीच्या दिशेने जाणारा रस्ता बंद राहणार आहे. या कालावधीत रस्त्यावर डांबरीकरणाचे काम होणार असल्याने, वाहनधारकांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी येणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून पर्यटकांना आतकरवाडीतून पायी मार्गाने किल्ल्यावर जाता येणार आहे.
मुंबई: येत्या ३० नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मात्र एकदिवसीय मालिकेच्या आधी सुरू असणाऱ्या कसोटी ...
पानशेत, खानापूर, डोणजे आणि आतकरवाडी मार्गे सिंहगड घाटमार्गाने खेड-शिवापूरकडे जाणारी वाहतूक आता डोणजे चौकापासून खडकवासला, किरकटवाडी, नांदेडसिटी आणि वडगाव धायरी मार्गे पुणे-बंगळुरू महामार्गावर वळवण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळेवाडी चौक ते सिंहगड पाट (कोंढणपूर बाजूकडून) या मार्गावर वाहनांना जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.