‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे. २०२७ साठीचा सन्मान पुण्याला मिळण्याची आशा आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.


राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) आयोजित पुणे पुस्तक महोत्सव यंदा १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत वासापूजन करून महोत्सवाच्या मांडव उभारणीला सुरुवात करण्यात आली. ‘एनबीटी’चे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद काटीकर, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, बागेश्री मंठाळकर, या वेळी उपस्थित होते.


पाटील म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सवाचे आता तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांत पुणेकर या महोत्सवाशी जोडले गेले आहेत. ‘युनेस्को’च्या २०२७च्या जागतिक पुस्तक राजधानी सन्मानासाठी पुण्याचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. जगातील अन्य देशांचेही अर्ज असतात. त्यामुळे कोणत्या स्थळाला पुस्तक राजधानीचा मान मिळणार, त्याची घोषणा फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. या घोषणेच्या अानुषंगाने यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवाची युनेस्कोच्या समितीकडून पाहणी होणार आहे. यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव आणखी व्यापक होणार आहे.’


डुडी म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी जयपूरला छोट्या स्तरावर सुरू झालेला साहित्य महोत्सव मोठा होत गेला. त्यातून तेथील पर्यटन, संस्कृतीसह अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी ‘युनेस्को’च्या जागतिक पुस्तक राजधानी या सन्मानासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे. ४५० किलोमीटरची ही स्पर्धा चार दिवसांत होणार आहे. या स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणून मान्यता मिळाली आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहराला ‘ग्लोबल सिटी’ म्हणून ओळख मिळणार आहे.


Comments
Add Comment

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह

Pandharpur Temple | मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिरात भाविकांसाठी विशेष नियोजन; १३ व १४ जानेवारीला दर्शन वेळापत्रकात बदल

पंढरपूर : मकरसंक्रांती आणि भोगी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात

पीएमपीएमएल प्रशासनाचा मोठा निर्णय; 'हे' दोन दिवस प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ ६०० बस शिल्लक

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रकिया सुरुळीत पर पाडण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाचा मोठा

काळाने घातला घाला ; पंढरपुरातील अहिल्या पुलावर ट्रॅक्टर आणि कंटेनरचा भीषण अपघात

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावर रविवारी रात्री एक हृदयपिळवणारा

Pune News :पुण्यातील रस्ते केले साफ,पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा.. नक्की काय होणार ?

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था हा नेहमीच नागरिकांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे.पण पुण्यातील