गंभीर जखमींना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, सरकारचा मोठा निर्णय
कर्नाटक : भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना ५ लाखांची भरपाई मिळणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. यामुळे कर्नाटकातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशात भटक्या कुत्र्यांचे नागरिकांवर वाढते हल्ले लक्षात घेता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना ५ लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. जखमींनाही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिताला एकूण ५००० रुपये मिळणार आहेत. यातील ३५०० हजार रुपये थेट पीडित व्यक्तीला मिळणार तर १५०० रुपये आरोग्य सुरक्षा ट्रस्टला दिले जाणार आहेत.
वरिष्ठ काँग्रेस नेते, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी तामिळनाडूमध्ये कुत्रा चावणे आणि रेबीजने मृत्यू होणाऱ्या घटनेवर चिंता व्यक्त केली होती. तामिळनाडूमध्ये भटक्या कुत्र्यांनी आतापर्यंत ५.२५ लाख लोकांवर हल्ले केले आहेत. यात २८ लोकांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ चिदंबरम यांनी दिला होतासुप्रीम कोर्टाने याबाबत जे स्पष्ट केले ते सांगताना चिदंबरम यांनी म्हटलंय की, लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांची पुन्हा सुटका करण्यात येणार आहे. लसीकरणाचा अर्थ कुत्र्यांना मारणे, असा होत नाही. खरंतर श्वानप्रेमींनी कोर्टाचा आदेश लागू करण्यासाठी मदत करायला हवी. कोर्टाचा हा निर्णय विशेष म्हणजे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा आहे'.
तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी सर्व राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालय, खेळाचे मैदान, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने स्पष्ट म्हटलं होतं की, पकडलेल्या कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून पुन्हा त्याच भागात सोडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं होतं.