अल्पवयीन मुले इसिसच्या रडारवर, ‘ऑपरेशन सिंदूर’चा नकाशा पाठविण्याचा आरोप

रायपूर (वृत्तसंस्था): छत्तीसगडमधील दहशतवादविरोधी पथकाने रायपूर आणि भिलाई येथून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दहावी आणि अकरावीत शिकणारे हे दोन्ही उच्च माध्यमिक विद्यार्थी दहशतवादी संघटना ‘आयएसआयएस’(इसिस) हँडलर्सच्या थेट संपर्कात होते. त्यांना ऑनलाइन माध्यमातून कट्टरपंथी सामग्रीद्वारे पद्धतशीरपणे भडकावले जात होते.


दोन्ही अल्पवयीन शस्त्रे उचलण्यास तयार होते आणि त्यांनी हँडलर्सना ‘ऑपरेशन सिंदूर’ संबंधित नकाशाची एक क्लिपिंग (नमुना) पाठवली होती. एटीएसने त्यांच्यावर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) ॲक्ट (उप्पा), १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांच्या कारवायांची सखोल चौकशी सुरू आहे. अल्पवयीन मुलांचे कुटुंब तपास यंत्रणांना सहकार्य करत असून, त्यांच्या मानसिक पुनर्वसनासाठी पाऊले उचलली जात आहेत, असे छत्तीसगड एटीएसने स्पष्ट केले आहे.


एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह सोशल मीडियावरील तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले. देखरेखीदरम्यान अधिकाऱ्यांना आयएसआयएसशी जोडलेला एक गोपनीय इंस्टाग्राम ग्रुप आढळला. पाकिस्तानी हँडलर्स कट्टरपंथी सामग्री अपलोड करत होते. हे दोन भारतीय अल्पवयीन मुले या ग्रुपमध्ये सक्रिय सहभागी होते. गेल्या दीड वर्षांपासून एटीएसने या अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवले होते. डिजिटल देखरेख टाळण्यासाठी पाकिस्तानी हँडलर्स वारंवार ग्रुप्स बदलत असत. ग्रुपमध्ये जास्त ट्रॅफिक आढळले किंवा यंत्रणांची पाळत असल्याचा संशय आला, तर तो ग्रुप अचानक डिलीट केला जात असे.


तणावाच्या काळात, पाकिस्तानी हँडलर्सनी संपर्क वाढवला


या अल्पवयीन मुलांना ‘डिजिटल मॉड्यूल’द्वारे प्रशिक्षण दिले जात होते. यामध्ये डार्क वेब, टीओआर, व्हीपीएन आणि बनावट आयपी ॲड्रेस यांसारख्या तंत्रांचा समावेश होता. ही सर्व तंत्रे कट्टरपंथी ऑनलाइनच्या माध्यमातून पुरवली जातहोती. कायदा अंमलबजावणी संस्थांना त्यांचा मागोवा घेणे शक्य होऊ नये यासाठी हे प्रशिक्षण दिले जात होते.भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात, पाकिस्तानी हँडलर्सनी अल्पवयीन मुलांशी संपर्क वाढवला. याच दरम्यान, भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि दोन्ही देशांनी लादलेली ‘मीडिया ब्लॅकआऊट’ची परिस्थिती होती. या माहितीच्या दरीचा फायदा घेत हँडलर्सनी मुलांना सक्रिय केले आणि त्यांना हवाई हल्ल्यांच्या नकाशांच्या क्लिपिंग्स भारतीय वृत्तवाहिन्यांकडून मिळवून पाकिस्तानला पाठवण्याची सूचना केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. छत्तीसगड एटीएसने अल्पवयीन मुलांच्या कुटुंबांना चॅट लॉग्स, स्क्रीनशॉट्स, हिंसक सामग्रीचे पुरावे आणि हँडलर्ससोबतच्या संवादाचे रेकॉर्ड दिले आहेत. आपले मुले एवढ्या मोठ्या प्रमाणात कट्टरपंथी कार्यात गुंतलेले आहेत हे पाहून कुटुंबांना धक्का बसला.

Comments
Add Comment

मुंबईत राडा, काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे मुंबईत राडा झाला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या ६६ किमी परिक्रमा मार्गाला ‘हिरवा कंदील’

भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणीकरिता सात हजार ९२२.११ कोटी रुपयांचा निधी मंजूर नाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी

रायगडमध्ये भाजप - राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रंगणार लढत, थंडीत रंगणार मित्रपक्षांचा सामना

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांमधील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांश नगरपालिकेत

पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका ६ बाद २४७

गुवाहाटी (वृत्तसंस्था): गुवाहाटीतील एसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट