कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक रॅकेट्सचा पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन सायहॉक’ असे नाव असलेल्या या कारवाईत तब्बल ४,४६७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून तांत्रिक पुरावे आणि विश्लेषणाच्या आधारावर ८७७ जणांना अटक करण्यात आली.


ही कारवाई केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या समन्वयाने पार पडली. नवी दिल्ली परिसरात चालणारे सायबर फसवणूक रॅकेट्स, म्यूल अकाउंट्स, रोख रक्कम काढणारे एजंट आणि बेकायदा कॉल सेंटर्स यांच्यावर ही धडक मोहीम लक्ष्यित करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतरच्या प्रतिक्रियेऐवजी, गुन्हेगारीचे मूळ उद्ध्वस्त करण्यासाठी ही महत्वाची प्रक्रीया असल्याचे पोलिसांनी सांगितले.


या तपासणीदरम्यान १,००० कोटींहून अधिक रकमेचे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड झाले. हे व्यवहार दिल्लीतील संघटित सायबर सिंडिकेट्सकडून चालवल्या जाणाऱ्या म्यूल अकाउंट्समधून फिरवल्याचा संशय असल्याची माहिती संयुक्त पोलीस आयुक्त (इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) रजनीश गुप्ता यांनी दिली.


दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत ३६० नवीन गुन्हे दाखल झाले. नोकरीच्या आमिषाने फसवणूक, गुंतवणूक घोटाळे, ग्राहकसेवा प्रतिनिधींचे खोटे रूप धारण करणे, टेक-सपोर्ट फसवणूक अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांत वापरली जाणारी अनेक बेकायदा कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. दरम्यान मोबाइल फोन, लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह, सिम कार्डस्, आर्थिक नोंदी आणि डिजिटल पुरावे असे मोठ्या प्रमाणात साहित्य पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी

दिल्ली स्फोटासाठी घरघंटीत बनवली स्फोटके

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाच्या तपासात पोलिसांना मोठा

शौर्य पाटील मृत्यू प्रकरणी दिल्ली सरकारची चौकशी समिती

सेंट कोलंबस शाळेच्या चार शिक्षिका निलंबित नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीला शिकणारा सांगलीचा १६

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या