शिवकुमार यांचे 'ते' विधान आणि कर्नाटकच्या काँग्रेस नेत्यांची खर्गेंसोबत अचानक भेट! कर्नाटकातील राजकारणात बदल घडणार?

नवी दिल्ली: कर्नाटकातील नेतृत्व बदलाच्या वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निष्ठावंत काँग्रेस नेत्यांच्या एका गटाने काल (२० नोव्हेंबर) नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. रात्री उशिरा झालेल्या या बैठकीमुळे कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही भेट एवढी तात्काळ ठरवली गेली की, सुरक्षा यंत्रणांनासुद्धा याबद्दल माहिती नव्हती.



२०२३ मध्ये, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर, मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा झाली. यानंतर सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली, तर काँग्रेस हायकमांडने तडजोड केल्यामुळे शिवकुमार उपमुख्यमंत्री झाले. या गोष्टीला अडीज वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच 'रोटेशनल मुख्यमंत्री फॉर्म्युला' बद्दलच्या चर्चांना जोर आला आहे. ज्या अंतर्गत शिवकुमार कार्यकाळाच्या मध्यभागी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारू शकतात, परंतु अद्याप पुष्टी झालेली नाही.





दरम्यान, गलुरू येथे इंदिरा गांधी जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात डीके शिवकुमार यांनी महत्त्वाचे विधान केले होते. ज्याचे अनुमान यापूर्वी शिवकुमार यांनी स्वत: डावलून टाकले होते. ते म्हणाले की, मी या पदावर कायम नाही राहू शकत. या पदावर राहून मला साडेपाच वर्षे झाली आहेत. यावर्षी मार्चमध्ये सहा वर्षे पूर्ण होतील. कोणतेच पद नेहमीसाठी नसते." शिवकुमार यांच्या या विधानामुळे दिल्लीतील चर्चांना आधार मिळाला. तर सिद्धरामय्या यांनी सांगितले की, ते पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील.

Comments
Add Comment

अदानी समुह अदानी विल्मर लिमिटेडमधून संपूर्णपणे 'Exit' ब्लॉक डील मार्फत आपली ७% हिस्सेदारी विकली

प्रतिनिधी:एक्सचेंज फायलिंगमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, अदानी विल्मर लिमिटेडमधील उर्वरित ७% हिस्साही (Stake)

Groww शेअर 'सुसाट' वेगाने तिमाही निकाल जाहीर होताच ७% उसळला दोन दिवसांची रिकव्हरी एकाच दिवसात!

मोहित सोमण:  ग्रो (Billionbrains Garage Ventures LLC Limited) कंपनीचा शेअर तिमाही निकालानंतर सुसाट वेगाने उसळला आहे. आज दुसऱ्या तिमाहीचा

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

नवी यूपीआयची दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये मेट्रो प्रवाशांसाठी ओएनडीसी नेटवर्कशी हातमिळवणी

भारत: नवी यूपीआयने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) नेटवर्कशी नुकतीच हातमिळवणी केली आहे. आधीच्या तुलनेत मेट्रो

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा विद्यार्थांना अर्थव्यवस्थेतील अभिषणात 'हे' महत्वाचे बोलून गेले

प्रतिनिधी: दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे वी के आर वी राव प्रतिष्ठान संवाद येथे दिलेल्या आपल्या अभिभाषणात

शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर! 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ईडन गार्डनवर झालेल्या