पुण्यात म्हाडाची मोठी घोषणा; ४ हजारांहून अधिक घरांसाठी वाढीव मुदत

पुणे : पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ४,१८६ घरांसाठी आयोजित संगणकीय सोडतीच्या अर्जाची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक नागरिकांना ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.


या सोडतीसाठी आतापर्यंत तब्बल १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेच्या भरण्यासह नोंदवले गेले आहेत. संगणकीय सोडत ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता काढली जाणार आहे. अर्जदारांना ३० नोव्हेंबरपर्यंत RTGS अथवा NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करता येईल.


तांत्रिक अडचणींमुळे काही अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अपूर्ण राहिल्याने मुदतवाढ मागणी करण्यात आली होती. तसेच नागरिकांकडून आलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून म्हाडाने ही अंतिम मुदतवाढ जाहीर केली आहे. नव्या वेळापत्रकाची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. इतर अटी पूर्वी जाहीर केलेल्या जाहिरातीनुसारच राहणार आहेत, अशी माहिती पुणे मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली.


या सोडतीत चार प्रमुख गटांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत १६८३ घरांचा समावेश आहे, तर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत २९९ घरे उपलब्ध आहेत. १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत पीएमआरडीए हद्दीत ८६४ घरे देण्यात आली आहेत. तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्रातील ३२२२ घरांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! नाशिकनंतर पुण्यातही चिमुकलीवर अत्याचार, ऊसतोड कामगाराचे अमानुष कृत्य

पुणे: नाशिकच्या मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येचा विषय ताजा असतानाच, पुण्यातून एक बातमी समोर आली

पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या सदनिका सोडतीच्या अर्जाची मुदत वाढली

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व

४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी

८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मुंबई : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण

राज्यातील फार्मसी अभ्यासक्रमांच्या यंदाही २५ ते ३० टक्के जागा रिक्त

मुंबई  : कोरोना महामारीत फार्मसी उद्योगाला मिळालेल्या महत्त्वामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांची लोकप्रियता

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर

पुणेकरांनो नव्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या ४,१८६ घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली

पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध