‘अबब! विठोबा बोलू लागला’ बालनाट्य नव्या संचात

गेल्या वर्षभरात विविध विषयांवर अनेक मराठी नाटकं रंगभूमीवर आली. नवीन नाटकांसोबतच जुनी गाजलेली काही नाटकं रंगभूमीवर पुन्हा अवतरली. या नाटकांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. यामध्ये बालरंगभूमीसुद्धा मागे नाही. वेगवेगळ्या विषयांच्या बालनाट्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली असताना आता ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे जुनं गाजलेलं बालनाट्य रंगभूमीवर पुन्हा धमाल करायला सज्ज झालं आहे.


२ ऑगस्ट १९५९ रोजी स्थापन झालेली भारतातील पहिली बालनाट्य संस्था म्हणजेच सुधाताई करमरकर यांनी स्थापन केलेली ‘लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमी, नीळकंठ नांदुरकर लिखित ‘अबब! विठोबा बोलू लागला’ हे धम्माल विनोदी नाटक नव्या संचात रंगभूंमीवर लवकरच घेऊन येत आहे. पूर्वी या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे, विनोद हडप अशा दिग्गजांनी काम केले आहे. हे नाटक त्यांनी त्याकाळी खूप गाजवले. आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे धम्माल पुजारी साकारणार आहेत. त्यांच्यासोबत नीता दोंदे, सागर पवार, प्रकाश अय्याळ तसेच बालकलाकार आयुष टेंबे, किनारा पाटील, गोजिरी जगदाळे या कलाकारांच्या भूमिका आहेत.


मालिका-चित्रपट दिग्दर्शक प्रशांत गिरकर हे ‘अबब! विठोबा बोलू लागला’ या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून या नाटकाचे पोस्टर अनावरण प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर व ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना व पालकांना आपल्या संस्कार व संस्कृतीचे विनोदी अंगाने दर्शन देणारे हे नाटक डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे.

Comments
Add Comment

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता

पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे

देवीच्या जत्रेत छाया कदमची कोकणात हजेरी

अभिनेत्री छाया कदम यांनी कोकणातील धामापूर गावातील सातेरी देवीच्या जत्रेला हजेरी लावत एक खास व्हिडीओ सोशल

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स