धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६ वयोवृद्ध रुग्णांना योग्य देखभालीचे आश्वासन देणाऱ्या एका संस्थेकडून अक्षरशः रस्त्यावर सोडून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


ससून रुग्णालयातून ‘आस्क ओल्ड एज होम’ या दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे काही दिवसांपूर्वी हे जेष्ठ नागरिक सोपवण्यात आले होते. संस्थेची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयात असली तरी प्रत्यक्षात फुरसुंगी येथे चालणाऱ्या वृद्धाश्रामाची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सरकारने आपल्या संस्थेसाठी मोफत जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा वृद्धांची काळजी घेता येणार नाही, असा दावा करत गायकवाड यांनी या रुग्णांना भारत फोर्ज कंपनीजवळील मोकळ्या जागेतच आणून ठेवलं.


कडाक्याच्या थंडीत या १६ वृद्धांना उघड्यावर सोडण्यात आले होते. त्यापैकी काहींना गंभीर जखमा असून त्यातून रक्त वाहत असल्याचे दृश्य पाहणाऱ्यांच्या हृदयाला चटका लावणारे होते. ससून रुग्णालयाकडून सांभाळासाठी सोपवलेले इतर रुग्ण या ठिकाणी आढळून आले नाही. त्याबाबत विचारणा केली असता गायकवाड आणि ससून रुग्णालयाचे अधिकारी परस्परांवर जबाबदारी ढकलताना दिसले.


दरम्यान, एका वृद्ध रुग्णाला पाणी पाजत असलेल्या महिलेला पत्रकारांनी विचारणा केली असता ती त्यांची मुलगी असल्याचे सांगितले. मात्र वडिलांना घरी का नेत नाही, याबाबत तिने मौन बाळगल्याने संताप व्यक्त होत आहे.


घटनेची दखल घेत समाजकल्याण खात्याने हस्तक्षेप केला असून दादासाहेब गायकवाड यांच्या फुरसुंगी येथील आश्रमाला काही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १६ पैकी १५ वृद्धांना पुन्हा त्या आश्रमात हलवण्यात आले, तर एकाला उपचारांसाठी पुन्हा ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. पुढील काळात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे समाजकल्याण आयुक्त दीपा मुंडे यांनी स्पष्ट केले.


या सगळ्या गोंधळात प्रकाश पुरोहित नावाचे एक ज्येष्ठ नागरिक मात्र बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. २३ सप्टेंबर २०२४ रोजी कोथरूडमधील नातेवाईकांनी त्यांना ससूनमध्ये दाखल केले होते. त्यानंतर ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये न आल्याने ४ डिसेंबरला त्यांना गायकवाड यांच्या संस्थेकडे सोपवण्यात आले. मात्र पुरोहित यांना पुन्हा ससूनमध्ये सोडले, असा दावा गायकवाड यांनी केला आणि ससून रुग्णालयाने तो साफ नाकारला. तक्रारीनंतर मुंढवा पोलिसांनी तपास सुरू केला असून पुरोहित यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

राज्यातील अतिवृष्टीत बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या.

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री

महाराष्ट्र पर्यटनाला नव्या उंचीवर नेणार - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

एमटीडीसी’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष लोगोचे अनावरण सुवर्णमहोत्सवी कॅलेंडर व डायरीचे

मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येतील - मंत्री नितेश राणे

मुंबई: मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना शासनामार्फत लवकरात लवकर राबविण्यात येतील,

राज्यातील जलवाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कँडेला कंपनीसोबत महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई: राज्यातील जलवाहतूक क्षेत्र अधिक अत्याधुनिक आणि वेगवान करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री

Pune News : पुणे विद्यापीठाजवळील यू-टर्न धोकादायक; नियमभंगामुळे अपघातांत वाढ

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील ब्रेमेन चौक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील कॉसमॉस बँक येथील यू-टर्न

Nagpur Accident: कबड्डीपटूंना बुलेट स्टंटबाजी नडली, भर रस्त्यात करुण अंत

नागपूर: नागपूर शहरातील दोन तरुण कबड्डीपटूंना बुलेट वरून स्टंटबाजी करणं महागात पडलं आहे. या स्टंटबाजीमुळे दोन्ही