Nagpur Accident: कबड्डीपटूंना बुलेट स्टंटबाजी नडली, भर रस्त्यात करुण अंत

नागपूर: नागपूर शहरातील दोन तरुण कबड्डीपटूंना बुलेट वरून स्टंटबाजी करणं महागात पडलं आहे. या स्टंटबाजीमुळे दोन्ही खेळाडूंना जागीच आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे शहरात सध्या सर्वत्र काळजी आणि संतापाचं वातावरण आहे.


वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौक दरम्यान ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काल रात्री (१६ फेब्रुवारी) सुमारे ११ ते १२ च्या दरम्यान जीटी बुलेटवर स्वार असलेले दोन युवक वारंवार चौकातून वेगात फेऱ्या मारताना दिसत होते. सिग्नलचे पालन न करता त्यांनी दोन वेळा जनता चौक ते बजाजनगर या मार्गावरून सतत स्टंटबाजी केली. विष्णूजी की रसोईसमोरून जात असताना त्यांनी एका महिला दुचाकीस्वाराला कट मारला आणि त्यांचा बुलेटवरील ताबा सुटला आणि बुलेट रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या पिलरवर आदळली.


या अपघातात १९ वर्षीय युग विशाल चनकापूरे आणि १९ वर्षीय रुद्र शशिकांत सोमकुंवर, दोघेही रा. काचीपुरा, गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ त्यांना रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेनंतर नागरिकांनी वर्धा मार्गावर रात्रीच्या वेळी विशेष वाहतूक मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम