'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ते गृहखात्याशी संबंधित उत्तर विभागीय परिषदेच्या ३२ व्या बैठकीत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे, असेही अमित शाह म्हणाले.


दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाने 'घृणास्पद दहशतवादी हल्ला' म्हणून घोषित केले. तसेच स्फोटात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा केली जाईल अशीही घोषणा केली होती.




दरम्यान, राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. एनआयएने उमरचा आणखी एक सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ ​​दानिश याला श्रीनगरमधून अटक केली आहे. हमाससारखे ड्रोन आणि छोटे रॉकेट बनवून भारतात मोठा हल्ला करण्यासाठी तो योजना आखत होता.

Comments
Add Comment

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे