गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे गुवाहाटी येथील कसोटी सामना भारतासाठी ‘करो किंवा मरो’ अशा स्वरुपाचा आहे. या पार्श्वभूमीवर कोलकातातील एक वेगळीच घटना चर्चेचा विषय ठरली आहे.



दक्षिण आफ्रिकन खेळाडूंची रात्री वैद्यकीय तपासणी


पहिला कसोटी सामना संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघातील काही प्रमुख खेळाडूंनी रात्री उशीरा कोलकातातील वुड्सलँड्स रुग्णालयात तपासणीसाठी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या आरोग्य तपासणीमुळे क्रिकेटविश्वात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, याच रुग्णालयात भारतीय फलंदाज शुभमन गिलदेखील दाखल होता आणि काल सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.



नियमित तपासणी की इतर कारण ?


भारतीय हवामानात मॅच खेळल्यानंतर किंवा सततच्या प्रवासानंतर खेळाडूंची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यामुळे हे फक्त रुटीन चेकअप असण्याची शक्यता आहे. मात्र, आफ्रिकन खेळाडू रुग्णालयात का आले होते याचे अधिकृत कारण अद्याप समजलेले नाही. वैद्यकीय तपासणीनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुवाहाटीला रवाना होणार असल्याचे कळते.


भारतीय संघ सध्या कोलकात्यातच सरावात व्यस्त आहे. पुढील सामन्यासाठी पर्यायी संघरचना तपासली जात आहे. शुभमन गिल अद्याप पूर्ण तंदुरुस्त नसल्याने साई सुदर्शन आणि देवदत्त पडीक्कल या दोघांकडे प्रशिक्षक गौतम गंभीर विशेष लक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारत पुन्हा एकदा डावखुऱ्या फलंदाजांच्या संख्येवर भर देणार का, याबाबत उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

FIFA : ट्रम्प यांचा फुटबॉलमध्ये राजकीय हस्तक्षेप; फिफाच्या रेड कार्ड निर्णयावर जागतिक वादंग

सिएटल: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेचा स्टार स्ट्रायकर फोलारिन बालोगुन याच्यावरील रेड-कार्ड बंदी फिफाने

FIFA WORLDCUP 2026 : विश्वचषकातून अमेरिकेचे आव्हान संपुष्टात; बेल्जियमची उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिएटल: सिएटलच्या ल्युमेन फील्डवर सोमवारी रात्

FIFA WORLDCUP 2026 : स्पेन उपांत्यपूर्व फेरीत; रोनाल्डोच्या विश्वचषक कारकिर्दीचा शेवट

आर्लिंग्टन, टेक्सास: मिकेल मेरिनोच्या अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे स्पेनने पोर्तुगालचा १-० ने पराभव करत

Cristiano Ronaldo : ‘हाच माझा शेवटचा विश्वचषक!’ क्रिस्टियानो रोनाल्डोच्या भावनिक घोषणेनंतर फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का

नवी दिल्ली : जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आपल्या

Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा महिला टी-२० क्रिकेटवर दबदबा कायम; इंग्लंडला हरवत विक्रमी सातव्यांदा विश्वविजेते

Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध करत टी-२०

FIFA WORLDCUP 2026 : १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडची मेक्सिकोवर मात; उपांत्यपूर्व फेरीत एर्लिंग हालंडच्या नॉर्वेशी होणार गाठ

मेक्सिको सिटी: एस्टाडिओ अझ्टेका स्टेडियमवर रव