Ladki Bahin Yojana E- KYC : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! E-KYC ला ४३ दिवसांची मुदतवाढ, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? वाचा

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojna) अंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत मुदतवाढ दिली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर होती, ती आता ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच, अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रियेत ओटीपी (OTP) प्राप्त होणे अशक्य होणे किंवा इतर तांत्रिक समस्या उपस्थित केल्या होत्या.


या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,(Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निर्देशानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत, त्यांना या विस्तारित कालावधीत काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत त्यांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील. मंत्री आदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी लाभार्थी महिलांना आवाहन केले आहे की, या विस्तारित कालावधीत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा.



ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?



  • लाभार्थींनी त्यांच्या मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.

  • पोर्टलवर लॉगिन केल्यावर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि Captcha Code योग्य ठिकाणी टाका.

  • आधार प्रमाणिकरणासाठी परवानगी देऊन 'Send OTP' या पर्यायावर क्लिक करा.

  • आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाईप करा.

  • यानंतर, पती/वडिलांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नमूद करून त्यांची OTP प्रक्रिया पूर्ण करा.

  • लाभार्थी भगिनीचा जात प्रवर्ग निवडा.

  • आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर क्लिक करून संपूर्ण माहितीची एकदा पडताळणी करावी आणि 'Submit' बटण क्लिक करावे.

  • 'e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली' असा संदेश स्क्रीनवर दिसल्यास प्रक्रिया पूर्ण झाली समजावी.



ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे



  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि फोटो.

  • रेशन कार्ड आणि उत्पन्नाची माहिती.

  • डोमासाईल किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल.

  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास, पतीचे वरीलपैकी कोणतेही (१५ वर्षांपूर्वीचे) अधिवास सिद्ध करणारे कागदपत्र लागेल.

  • वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शुभ्र शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल.

  • बँक खाते तपशील (Bank Account Details) आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह