नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल


मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे. हे सर्व रोखण्यासाठी नैसर्गिक शेतीलाच प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व प्रबुद्ध समाजाने आपल्या स्तरावर नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. ‘संकल्प फाउंडेशन’ या प्रशासकीय अधिकारी घडवणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांसाठी ‘नैसर्गिक कृषी : अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर राजभवन मुंबई येथे आयोजित चर्चासत्रामध्ये संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.


मोठ्या प्रमाणात होत असलेली रासायनिक खतांची आवक थांबवली पाहिजे या खतांमुळे गहू व तांदूळ यातील पोषणमूल्य कमी झाले आहे. भावी पिढ्यांची अन्नधान्य व जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक आहे असे राज्यपाल म्हणाले. नैसर्गिक शेती मानव तसेच सूक्ष्म जीव यांचे कल्याण करेल, असेही राज्यपाल म्हणाले.


धर्म, अर्थ व काम यांच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीसाठी निरामय आरोग्य आवश्यक आहे व आरोग्यासाठी दिनचर्या, भोजन यांसह पर्यावरण महत्त्वाचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले. आज जागतिक तापमानवाढीचे जगापुढे मोठे संकट आहे. त्याचा थेट परिणाम शेतीवर पडत आहे. त्यामुळे सर्वांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी व नैसर्गिक उत्पादने खरेदी करावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.


Comments
Add Comment

१ एप्रिलपासून मर्सिडीज-बेंझच्या कार किमतीत २ टक्क्यांची होणार वाढ

मुंबई : जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारातील ग्राहकांसाठी एक

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Borivali National Park Toy Train : वनराणी इज बॅक! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा धावणार!

मुंबई : बोरिवलीच्या निसर्गरम्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा एकदा पर्यटकांच्या

मुंबईकरांसाठी मोठी संधी! म्हाडाची २५०० घरांची लॉटरी, तारीख झाली जाहीर

मुंबई : मुंबईत स्वतःचे घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र वाढत्या मालमत्ता दरांमुळे सर्वसामान्यांना घर

पश्चिम रेल्वेवर आज - उद्या 'मेजर ब्लॉक'

लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल मुंबई  : पश्चिम रेल्वेवर परिचालन कार्य आणि प्रभादेवी रोड ओव्हर

गॅसनंतर आता 'पाणी'ही महाग?

बाटलीबंद पाण्याच्या दरात घाऊक बाजारात वाढ मुंबई  : इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे