गॅसनंतर आता 'पाणी'ही महाग?

बाटलीबंद पाण्याच्या दरात घाऊक बाजारात वाढ


मुंबई  : इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता दुहेरी कात्री लागण्याची शक्यता आहे. आधीच एलपीजी गॅसच्या तुटवड्याने हैराण झालेल्या जनतेसमोर आता बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने बाटल्यांच्याira निर्मितीचा खर्च वाढला असून, घाऊक बाजारात पाण्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.


बाटलीबंद पाण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक बाटल्या तयार करण्यासाठी कच्च्या तेलाची आवश्यकता असते. युद्धामुळे कच्च्या तेलाची उपलब्धता कमी झाली असून, वाहतुकीचा मार्ग लांबल्याने खर्चात मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम बाटल्यांच्या उत्पादनावर झाला असून घाऊक विक्रेत्यांनी दरात वाढ केली आहे.


आधीच कमर्शियल गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल आणि खाणावळ मालक अडचणीत आहेत. आता पाण्याच्या बाटल्या महागल्याने ग्राहकांच्या थाळीचे आणि पिण्याच्या पाण्याचे दर वाढण्याची चिन्हे आहेत. घरगुती गॅसची नोंदणी वेळेत होत नसल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अशातच पाण्याचे दर वाढल्याने मध्यमवर्गीयांचे मासिक बजेट कोलमडणार आहे. घाऊक बाजारातील दरवाढीचा फटका लवकरच किरकोळ बाजारातही दिसेल, ज्यामुळे प्रति बाटली ५ ते १० रुपयांची वाढ होण्याची भीती विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात शीतपेये आणि इतर प्लास्टिक बंद उत्पादनांच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात
येत आहे.


कच्च्या तेलामुळे अनेक प्लास्टिकच्या वस्तू तयार केल्या जातात. त्याच्या उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे इतर प्लास्टिकच्या वस्तू देखील महाग होण्याची शक्यता आहे. पूर्वीपेक्षा आता बाटलीबंद पाण्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्यातून मिळणारा नफा देखील कमी झाला आहे.
- लता वेरणेकर, दुकानदार



नफ्यावर परिणाम


परंतु सर्वसामान्यांना किरकोळ बाजारात सध्या तरी कमाल किरकोळ विक्री किमतीमध्ये (एमआरपी) पाण्याची बाटली मिळत आहे. परंतु घाऊक बाजारात भाववाढ झाल्याने किरकोळ विक्रेत्यांच्या नफ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. पूर्वी अर्धा लीटर २४ पाणी बंद बाटल्यांचा बॉक्स १२० रुपयांना किरकोळ व्यापाऱ्यांना मिळत होता. परंतु आता हाच बॉक्स १४० रुपयांना विक्री होत आहे. तर एक लीटरच्या १२ बाटल्यांच्या पाण्याच्या बाटलीसाठी आता १०५ रुपये मोजावे लागत होते. पूर्वी हा बॉक्स ९० रुपयांना मिळत होता.

Comments
Add Comment

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची