येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री


छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षण, उपचारात वापर, संशोधन अशा विविध प्रकारे चालना दिली असून येणारा काळ हा आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सातार तांडा भागातील श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड, श्रीयश प्रतिष्ठानचे बसवराज मंगरुळे, सचिव संगिता मंगरुळे, रुग्णालय अधीक्षक डॉ. परेश देशमुख, अधिष्ठाता स्वाती इटगे आदी मान्यवर उपस्थित होते.


भारतीय जीवनपद्धतीस अनुकूल व निसर्गाशी साधर्म्य सांगणारी ही उपचार पद्धती वेदांमध्ये आयुर्वेद या नावाने सांगण्यात आली आहे. आजाराच्या लक्षणांवर नव्हे तर मुळाशी जाऊन आयुर्वेदात उपचार केले जातात. ही उपचार पद्धती शाश्वत उपचार पद्धती आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीचा जगभरात वापर वाढत आहे. भारतात आयुर्वेद उपचार पद्धतीने उपचार घेण्यासाठी अनेक लोक येत आहेत. आयुर्वेदाने या जगाला विज्ञाननिष्ठ उपचार पद्धती देऊन शल्यचिकित्सा पद्धतीही दिली आहे; असे मुख्यमंत्री म्हणाले.


कोविड काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पूरक औषधांमध्ये आयुर्वेदीक औषधींचा सर्वाधिक समावेश होता. केंद्र सरकारमार्फत या उपचार पद्धतीला प्रोत्साहन दिले जात आहे. प्रशिक्षित वैद्य तयार करण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयांना चालना दिली जात आहे. आगामी दशकात भारत हा जगातली प्रमुख अर्थव्यवस्था बनून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ पाहत आहे. आपला देश २०४७ पर्यंत आर्थिक महासत्ता झालेला असेल. मराठवाड्यातही आपण उद्योग क्षेत्राला पाठबळ देत असून इलेक्ट्रिक व्हेईकलची कॅपिटल म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख निर्माण होत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


Comments
Add Comment

महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार

स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्प मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा

नवी मुंबईकरांना दिलासा; पनवेल, मुंबई, नवी मुंबई, ठाणेला जोडणारा रस्ता होणार लवकरच पूर्ण

नवी मुंबई : उरण पूर्व भागाचा पनवेल, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याशी थेट संपर्क साधणारा गव्हाणफाटा ते चिरनेर

Pune Cycle Tour : पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल टूरला अपघाताचे गालबोट; ५० हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर धडकले अन्...

पुणे : जागतिक स्तरावर पुण्याचे नाव उंचावणाऱ्या 'बजाज पुणे ग्रँड सायकल टूर' या भव्य स्पर्धेला मंगळवारी एका भीषण

महाराष्ट्राच्या तरुणाने न्यूझीलंडमध्ये घोडेस्वारीची शर्यत जिंकली

पंढरपूर : कान्हापुरी (ता. पंढरपूर) येथील राहुल रघुनाथ भारती या तरुणाने न्युझीलंडमध्ये ‘हार्स रेसिंग स्पर्धेत’

टीईटी सक्तीतून जुन्या शिक्षकांना मिळणार मुक्ती?

न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारच्या हालचालींना वेग पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीमुळे देशभरातील

माथेरानमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूट

कदम दाम्पत्याला दोरीने बांधून चोरटे फरार माथेरान (वार्ताहर): पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये टी स्टॉलवर