पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट), ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष हे तीनही पक्ष आपापल्या ताकदीवर मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने पालघरची निवडणूक रंगणार आहे.


शिंदे गटाकडून उत्तम घरत, भाजपकडून कैलास म्हात्रे, तर ठाकरे गटाकडून उत्तम पिंपळे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि ट्री मॅन अशी प्रतिमा असलेले प्रीतम राऊत यांनीही आपण नगराध्यक्ष व्हावे, अशी इच्छा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राऊत यांनी मात्र आपला पक्ष जाहीर केला नसला तरी नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे.


याशिवाय शिंदे गटातील बंड्या म्हात्रे हेही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे गटातच उमेदवारीसाठी अंतर्गत चढाओढ दिसत आहे.दरम्यान, उबाठाचे गटनेते कैलास म्हात्रे यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र, नुकतेच पक्षात दाखल झालेल्यांना थेट उमेदवारी देऊ नये, असा मतप्रवाह भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.


भाजपचे जिल्हास्तरीय नेते प्रशांत पाटील यांनीही उमेदवारीसाठी तयारी दर्शवली असून "कुठल्याही स्थितीत ही निवडणूक मी लढवणारच," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपमध्येही उमेदवारीवरून मतभेद उफाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गटानेही संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून पालघर नगर परिषदेत पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, तर शिंदे गटाचे कार्यकर्ते "विकासाच्या राजकारणा"चा मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या सर्व घडामोडींमुळे पालघर नगर परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक न राहता राज्यातील मोठ्या राजकीय शक्तींच्या प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. पुढील काही दिवसांत प्रत्येक पक्षाची उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून त्यानंतरच या तिरंगी लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

हानिकारक मासेमारीवर बंदी नवीन नियमानुसार, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई