व्हिडीओची सत्यता तपासण्याचे वन विभागाचे आवाहन

सोशल मीडियावरील एआय बिबट्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे भीतीचे वातावरण


जुन्नर  : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील जुन्नर, आंबेगाव, खेडसह शिरूर तालुक्यात बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही एआयच्या आधारे तयार केलेले बिबट्याचे, वाघाचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. ते व्हिडीओ खरे असल्याचा भास होत असल्याने परिसरातील नागरिकांची धास्ती वाढली आहे. अफवा टाळण्यासाठी अशा व्हिडीओ, फोटोंची सत्यता पडताळण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


अफवांना बळी पडू नका डीपफेकमुळे तणाव वाढतोय


या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये बिबट्या नेमक्या कोणत्या ठिकाणी दिसला, याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसते. अनेकदा व्हिडीओचे लोकेशन खोटे असल्याचे सिद्ध होते; परंतु एआय टूल्सच्या मदतीने तयार केलेले हे ‘डीपफेक’ व्हिडीओ इतके उच्च दर्जाचे असतात की नागरिकांना ते खरे वाटतात. लोकांमध्ये आपल्या घराशेजारी बिबट्या फिरत असल्याची अफवा पसरते. परिणामी, अनेक ठिकाणी अनावश्यक तणाव, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पोलीस यंत्रणा, वन विभागाशी संपर्क साधावा


या गंभीर समस्येवर प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम अशा व्हिडीओ आणि फोटोंच्या स्रोताची खात्री करणे आवश्यक आहे. स्थानिक वन विभाग किंवा पोलीस यंत्रणेने अधिकृतपणे माहिती दिल्याशिवाय कोणत्याही व्हिडीओवर किंवा फोटोवर विश्वास ठेवू नये. केवळ व्हॉट्सॲॅप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो म्हणून व्हिडीओवर विश्वास ठेवू नये. सर्वप्रथम वन विभागाशी संपर्क साधून सत्यता तपासावी.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये