बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला. जेडीयूपेक्षा ४ जागा अधिक मिळवल्याने बिहारमध्ये भाजपचे कमळ फुलणार असून विजयाचा भगवा फडकणार यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रात सुद्धा विधानसभा निवडणूकीत महायुती एकत्र लढली, मात्र सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. त्यामुळे भाजपने मित्रपक्षांची साथ घेतली तरी पक्ष म्हणून निवडणूकीत अव्वल ठरल्याचे नाकारता येत नाही. महाराष्ट्र आणि बिहार प्रमाणे अजून कोणत्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, हे सविस्तर जाणून घेऊया...


बिहार निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजप आणि एनडीए आता १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्तेत आहे. केवळ भाजपकडे लक्ष केंद्रीत केल्यास भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणासह अनेक प्रमुख राज्ये राखून आणि जम्मू आणि काश्मीरसारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षणीय यश मिळवून सर्वात लोकप्रिय राजकीय पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले.


भाजपच्या मुख्यमंत्री पदाचे चेहरे म्हणून योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), हिमंता बिस्वा सरमा (आसाम), देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र), आणि पुष्करसिंग धामी (उत्तराखंड) हे भाजपचे सर्वात प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. यामध्ये आता बिहारचा मुख्यमंत्री म्हणून भाजपचा चेहरा असण्याची शक्यता असू शकते.



तर आंध्र प्रदेश, ईशान्य आसाम, नागालँड आणि मेघालय या राज्यांमध्ये भाजपच्या मित्रपक्षांची सत्ता आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएने एकूण १८ जागांवर आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. यातून हे स्पष्ट होते की देशातील महत्त्वाची राज्ये ही एनडीएच्या ताब्यात आहेत.



मोदींचे आता 'बंगाल' लक्ष्य


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विजयानंतर कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना म्हटले की, ‘बिहारच्या विजयाने केरळ, तामिळनाडू, पाँडेचरी आणि पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांना नव्या ऊर्जेने भारावून टाकले आहे. गंगाही इथूनच जाते आणि बंगालला जाते. बिहारच्या विजयाने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. मी बंगालच्या नागरिकांनाही सांगतो, आता भाजप तुमच्या सोबत मिळून पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून फेकेल.



Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू