Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना जालन्याच्या बदनापूर परिसरात घडली आहे. बदनापूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील आरोपी आणि मृत व्यक्तीचे नातेसंबंध अत्यंत गुंतागुंतीचे आहेत, परमेश्वर राम तायडे (वय ३० वर्ष). आरोपी पत्नी मनिषा परमेश्वर तायडे (वय २५ वर्ष) आणि लहान दीर (सख्खा भाऊ) ज्ञानेश्वर राम तायडे (वय २८ वर्ष). सोमठाणा येथील मनिषा तायडे हिचे सख्खे लहान दीर ज्ञानेश्वर तायडे याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. मनिषाचा पती परमेश्वर तायडे या संबंधांमध्ये अडथळा ठरत होता. या अडथळ्यामुळे दोघांनी मिळून परमेश्वरची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार, १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास, ज्ञानेश्वर आणि मनिषा यांनी परमेश्वरच्या डोक्यात व चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. घटनेनंतर बदनापूर पोलिसांनी तातडीने तपास करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे आणि खळबळीचे वातावरण आहे.



सोमठाणा तलावात दगड बांधून मृतदेह फेकला


अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या परमेश्वर राम तायडे याची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपींनी (पत्नी आणि दीर) पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची अत्यंत क्रूरपणे विल्हेवाट लावली होती. आरोपींनी परमेश्वरचा मृतदेह एका मोठ्या गोणीत भरला आणि तो सोमठाणा तलावात आणून फेकला. विशेष म्हणजे, मृतदेह पाण्यावर तरंगणार नाही आणि कोणाच्या लक्षात येणार नाही, यासाठी त्यांनी त्या गोणीला दोरीच्या सहाय्याने दगड बांधून पाण्यात फेकून दिले होते. यादरम्यान, परमेश्वर अचानक घरी नसल्याची चर्चा संपूर्ण सोमठाणा गावभर सुरू झाली. गावात अगोदरच मृताची पत्नी आणि त्याच्या लहान दिरामध्ये अनैतिक संबंध असल्याची चर्चा होती. यामुळे परमेश्वरच्या बेपत्ता होण्याबद्दल गावभर शंका आणि चर्चेला उधाण आले. याच चर्चेचा सुगावा बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लागला. अखेर, या प्रकरणाचा तपास सुरू असताना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, बदनापूर हद्दीतील निकळज शिवारातील वाल्हा-सोमठाणा तलावात एका प्लास्टिकच्या मुरघासमध्ये गुंडाळलेले एक अज्ञात प्रेत आढळले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. ओळख पटविल्यावर तो मृतदेह सोमठाणा येथील रहिवासी परमेश्वर राम तायडे याचाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मृत परमेश्वरचे वडील राम नाथा तायडे (वय ५६ वर्ष) यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा (IPC कलम ३०२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अनैतिकसंबंधात 'अडथळा' ठरल्याने हत्या, पोलिसांसमोर 'लैला-मजनू'ची कबुली


परमेश्वर राम तायडे यांच्या हत्येचा छडा लावताना बदनापूर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांच्या जलद आणि गुप्त कारवाईमुळे अवघ्या काही तासांतच हत्येमागील संपूर्ण सत्य समोर आले आहे. पोलिसांनी आपल्या गुप्त खबऱ्यांमार्फत माहिती मिळवली, तेव्हा परमेश्वर याचा घात घरातच झाल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी कुठलाही वेळ न घालवता तात्काळ मृत परमेश्वर तायडे याची पत्नी मनिषा आणि सख्या भावाला ज्ञानेश्वर यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, तोपर्यंत पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी या दोन्ही आरोपींचा संपूर्ण माहिती काढून प्रकरणाचा उलगडा करून ठेवला होता. पोलिसांनी दोघांनाही पुरावे दाखवताच या दोघांनीही म्हणजे आरोपी मनिषा आणि ज्ञानेश्वर क्षणात गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत आरोपींनी सांगितले की, मनिषा आणि ज्ञानेश्वर यांच्यातील अनैतिक संबंधांना परमेश्वरचा तीव्र विरोध होता. याच संबंधात तो अडथळा ठरत असल्याने, दोघांनी मिळून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही तात्काळ अटक करून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाने जालना जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला पुणे : पुणे शहरात

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू