Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरला 'IMA'चा दणका! दिल्ली ब्लास्टनंतर अटक झालेल्या डॉ. शाहीनची 'आजीवन सदस्यता' रद्द

नवी दिल्ली : दिल्ली ब्लास्ट प्रकरणाशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात डॉक्टर शाहीन यांच्या कथित संलग्नतेवर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने कठोर पाऊल उचलले आहे. IMA ने डॉ. शाहीन यांच्यावर तात्काळ प्रभावाने कारवाई करत आजीवन सदस्यत्व रद्द केले आहे. केवळ इतकेच नव्हे, तर त्यांचा निष्कासन आदेश IMAच्या केंद्रीय कार्यालयाकडेही पाठवण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रकरणात नवा वळण आल्याचे मानले जात आहे.




दिल्ली ब्लास्टनंतर डॉ. शाहीन चर्चेत कशा आल्या?


१० नोव्हेंबरच्या संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक लोक जखमी झाले. या हादऱ्यामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये सुरक्षेचा उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या घटनेपूर्वी फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली होती. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी प्रथम ३०० किलोहून अधिक स्फोटक पदार्थ पकडला. त्यानंतर पुन्हा छापेमारी करताना तब्बल २५६३ किलो स्फोटक जप्त करण्यात आले. मिळालेल्या या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यामुळे तपास यंत्रणांना धक्काच बसला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवरच डॉ. शाहीन यांचे नाव तपासात समोर आल्याने त्या अचानक चर्चेत आल्या.



मुजम्मिलच्या निशानदेहीवर कारवाई; डॉ. शाहीनचीही अटक


दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील तपासादरम्यान तपास यंत्रणांनी आधीच अटक केलेल्या मुजम्मिल या आरोपीच्या माहितीनुसार मोठी कारवाई केली. मुजम्मिलकडून मिळालेल्या सुरागांवरून पोलिसांनी एक स्विफ्ट कार जप्त केली. ही कार डॉ. शाहीन नावाच्या महिला डॉक्टरांच्या नावावर असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी डॉ. शाहीन यांना देखील ताब्यात घेत अटक केली. तपासात असेही उघड झाले की डॉ. शाहीन यांचे मूळ संबंध उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील आहेत. या घडामोडींमुळे प्रकरणाने नवे वळण घेतले असून तपास यंत्रणांकडून दोघांकडून सखोल चौकशी सुरू आहे.



डॉ. शाहीनच्या अटकेवर कुटुंबीयांची प्रतिक्रिया : “आरोप ऐकून स्तब्ध झालो”


दिल्ली ब्लास्ट प्रकरणात अटक झालेल्या डॉ. शाहीन यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अटकेबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शाहीनच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी तिच्या स्वभावाबद्दल आणि मागील आयुष्याबद्दल बोलत तिच्या या सहभागात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डॉ. शाहीन यांच्या माजी पती डॉ. जफर हयात यांनी सांगितले की, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात शाहीनने कधीही बुरखा परिधान केला नव्हता. ती परदेशात जाऊन चांगले आयुष्य जगण्याची इच्छा बाळगत होती. जफर यांच्या मते शाहीन आपल्या मुलांसाठी प्रेमळ आणि काळजी घेणारी आई होती. शाहीनचे भाऊ मोहम्मद शोएब यांनीही महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून दोघांमध्ये कोणताही संपर्क नव्हता. शेवटची बोलणी चार वर्षांपूर्वीच झाली होती. तर शाहीनचे वडील सैयद अहमद अन्सारी यांनी मुलीच्या कथित सहभागाबद्धल ऐकून “स्तब्ध झालो” अशी भावना व्यक्त केली. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगीशी शेवटची बोलणी अंदाजे एक महिन्यापूर्वी झाली होती. कुटुंबीयांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यत्व रद्द! पक्षांतरविरोधी कायद्याचा पहिल्यांदाच देशात वापर

कोलकाता: कोलकाता उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले आहे.

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग हॉस्पिटलमध्ये ; प्रकृतीत सुधार

सिक्कीम : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांना गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

नवी पार्टी, नवे समीकरण ; महुआत तेज प्रतापांची परीक्षा

बिहार : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून सर्वच जागांवरून पहिल्या टप्प्यातील आकडे समोर

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा पाहाल? जाणून घ्या सविस्तर

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असल्यामुळे आकडेवारी वेगाने समोर येत आहे. तथापि, जर तुम्हाला

Bihar Election 2025 Results : बिहार विधानसभेत बहुमतासाठी किती जागांची गरज? जाणून घ्या फॉर्म्युला

पटणा : बिहारमध्ये कोणाची सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज स्पष्ट होणार आहे. सध्या राज्यातील विधानसभा

नितीश कुमार होणार मुख्यमंत्री! मतमोजणीची आकडेवारी येताच नेत्यांचा जल्लोष

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतांची मोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एनडीएला आघाडी मिळत