पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन तर आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, मिझो नॅशनल फ्रंट आणि पीपल्स डेमाक्रॅटिक पार्टी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.


जम्मू कश्मीरमधल्या नागरोटा मतदारसंघात देवयानी राणा, तर ओडिशातल्या नवपाडा मतदारसंघात जय ढोलकिया हे भाजपाचे उमेदवार निवडून आले. तेलंगणात हैद्राबादमधल्या ज्युबेली हिल्स मतदारसंघातून नवीन यादव, राजस्थानमधल्या अंता मतदारसंघात प्रमोद जैन भाया हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. बडगाममधे जम्मू काश्मीर पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीचे आगा सईद मुन्तजिर मेहदी, मिझोरममधे दाम्पा इथं मिझो नॅशनल फ्रंटचे डॉ. आर लालथंगलियाना, पंजाबच्या तरणतारण मतदारसंघात आम आदमी पार्टीचे हरमीत सिंग संधू, तर झारखंडच्या घाटशिला मतदारसंघात झारखंड मुक्तिमोर्चाचे सोमेश चंद्र सोरे निवडून आले आहेत.

Comments
Add Comment

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या

सुप्रीम कोर्टाची अरावली प्रकरणात स्वतःच्या निर्णयालाच स्थगिती

नवी दिल्ली : अरावली खटल्याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात पर्वतरांगांच्या नवीन व्याख्येवर

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून