बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरला भाजपने उमेदवारी दिली होती. मतमोजणी सुरू झाल्यापासून मैथिलीच्या मतदारसंघात काय होणार याकडे अनेकांचे लक्ष होते.


बिहारमधील अलीनगर मतदारसंघातून भाजपने गायिका मैथिली ठाकूरला उमेदवारी दिली. मैथिली विरोधात RJDने बिनोद मिश्राला उमेदवारी दिली. जनसुराज पक्षाने बिप्लब कुमार चौधरी याला उमेदवारी दिली होती. अलीनगर मतदारसंघासाठी एकूण १२ उमेदवार मैदानात उतरले होते.


अलीनगर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २५ फेऱ्या झाल्या, भाजपच्या मैथिली ठाकूरने एकूण ८४ हजार ९१५ मते मिळवली. मैथिलीचा विधानसभेच्या निवडणुकीत ११ हजार ७३० मतांनी विजय झाला. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या अर्थात आरजेडीच्या बिनोद मिश्रा यांना एकूण ७३ हजार १८५ मते मिळाली. त्यांचा या निवडणुकीत ११ हजार ७३० मतांनी पराभव झाला. विजयी झालेली मैथिली ठाकूर ही अवघ्या २५ वर्षांची आहे. ती बिहारची तरुण आमदार म्हणून लवकरच विधानसभेत आमदारकीची शपथ घेणार आहे.

Comments
Add Comment

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या

रायसिन विष बनवणाऱ्या सैयदचा पाकिस्तानशी संबंध उघड

ड्रोनद्वारे आणले शस्त्र, आयएसकेपीशी फोनवर संपर्क अहमदाबाद : प्रसादात विष कालवून लक्षावधी लोकांचा बळी घेण्याचे

Bihar Election Result 2025 : बिहारचे 'किंगमेकर' नितीश कुमार! महिला मतदारांच्या पाठिंब्याने '१० व्यांदा' मुख्यमंत्री होणार ?

पटणा : बिहार निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे की एनडीएने राज्यात प्रचंड बहुमत मिळवून सत्ता पुन्हा