माहिममध्ये उबाठाकडे मनसेची खुल्या प्रभागांची मागणी, पाच पैंकी तीन खुले प्रभाग आपल्याकडे घेण्याचा मनसेचा विचार

मुंबई (सचिन धानजी):  मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता इच्छुकांची भाऊगर्दी आणि महायुती व महाविकास आघाडीत जागा वाटपाला जोर येणार आहे. दक्षिण मध्य मुंबईतील माहिम विधानसभा क्षेत्र हे उबाठा आणि मनसे युतीचा प्रमुख केंद्र ठरणार आहे. या मतदार संघात पाच प्रभाग असून मनसेकडून तीन प्रभागांची मागणी होणार आहे. तीन खुल्या प्रवर्गासाठी मनसेची जोरदार मागणी असून उबाठा आता मनसेला या जागा सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल.


मुंबईतील माहिम विधानसभा क्षेत्रात नगरसेवकांचे पाच प्रभाग येत असून यामध्ये सध्या भाजपाचा एकमेव नगरसेवक असून उर्वरीत चार प्रभागांमध्ये शिवसेना आणि उबाठाचे प्राबल्य आहे. यामध्ये प्रभाग १८२(ओबीसी), प्रभाग १९० (खुला प्रवर्ग), प्रभाग १९१(ओबीसी महिला), प्रभाग १९२ (खुला प्रवर्ग), प्रभाग १९४ (खुला) असे आरक्षण पडले आहे. या निवडणुकीत उबाठा मनसे यांची युती असल्याने यामध्ये यातील प्रभाग क्रमांक १९०, १९२ आणि १९४ प्रभागांवर मनसेचा दावा असेल तर उबाठाच्या वाट्याला प्रभाग क्रमांक १८२ आणि प्रभाग क्रमांक १९१ येवू शकतील असा अंदाज आहे. मनसेची तीन प्रभागांची मागणी मान्य न झाल्यास प्रभाग क्रमांक १९० आणि १९२ वर मनसेचा पक्का दावा असेल.


तर या मतदार संघात प्रभाग क्रमांक १८२, १९१ आणि १९४ या प्रभागांमध्ये शिवसेनेचा दावा असेल तर भाजपाला प्रभाग क्रमांक १९० आणि १९२ सोडले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असूनही माहिम विधानसभेत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना मताधिक्य होते, तर विधानसभा निवडणुकीत उबाठा, मनसे आणि शिवसेना तिन्ही पक्षाचे उमेदवार स्वतंत्र लढल्यानंतर शिवसेनेच्या सदा सरवणकर यांचा निसटता पराभव झाला. त्यामुळे या मतदार संघात सदा सरवणकर हे भाजपाच्या मदतीने सर्व प्रभाग आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मनसेने उबाठासोतबत जुळवून घेतल्याने त्यांची उबाठाची ताकद वाढली आहे. त्यामुळे आमदार महेश सावंत हे मनसेच्या मदतीने पाचही प्रभागात आपले प्राबल्य राखण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मनसेला उबाठा किती जागा सोडते आणि भाजपासाठी किती जागा सोडल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष असेल.




संभाव्य प्रभाग आणि संभाव्य उमेदवार


प्रभाग क्रमांक : १८२ (ओबीसी)(दावा उबाठा)


उबाठा : मिलिंद वैद्य, अभय तामोरे


शिवसेना : मिलिंद तांडेल, श्रध्दा पाटील


प्रभाग क्रमांक : १९० खुला (दावा मनसे)


भाजपा : शीतल गंभीर-देसाई,


मनसे : मनिष चव्हाण


उबाठा : राजू पाटणकर


प्रभाग क्रमांक : १९१ (ओबीसी महिला)(दावा उबाठा)


उबाठा : दीपाली साने, वैशाली पाटणकर


शिवसेना : प्रिया सरवणकर


प्रभाग क्रमांक १९२ (खुला प्रवर्ग) (दावा मनसे)


भाजपा : जितेंद्र राऊत, अक्षता तेंडुलकर, सचिन शिंदे


मनसे : यशवंत किल्लेदार/स्नेहल जाधव


प्रभाग क्रमांक १९४ (खुला प्रवर्ग)


उबाठा : भगत


मनसे : यशवंत किल्लेदार/संतोष धुरी


शिवसेना : समाधान सरवणकर

Comments
Add Comment

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू