नवी दिल्ली: दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या मोठ्या स्फोटाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या दहशतवादी कटामध्ये केवळ पाच सहा जणांचा समावेश नाही तर एक मोठे नेटवर्क आणि स्लीपर सेल असल्याचे प्राथमिक तापसात समोर आले आहे. सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा या घटनेची मुळापासून चौकशी करत आहे. या तपासादरम्यान दहशतवाद्यांनी या स्फोटासाठी कोडवर्ड वापरल्याचे समोर आले आहे. हे कोडवर्ड अत्यंत साधारण वाटतात. पण याचा अर्थ फार खोलवर आहे.
तपास यंत्रणांच्या हाती या दहशतवाद्यांचा डिजिटल चॅटबॉक्स लागला आहे. ज्यात ‘मेजवानीसाठी बिर्याणी तयार आहे’ असा एक संदेश यंत्रणांना दिसला. यातून आरोपींनी संपूर्ण कटासाठी कोडवर्ड्स वापरल्याचे समोर आले आहे. यातील मेजवानी म्हणजे धमका अथवा स्फोट आहे. तर बिर्याणी म्हणजे स्फोटासाठीचे साहित्य असा अर्थ होतो. सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी हे कोडवर्ड वापरण्यात आले असून पोलिसांना एक डायरी पण सापडली आहे. त्यात ऑपरेशन हा शब्द अनेकदा वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या डिजिटल फॉरेन्सिक लॅबमध्ये हे कोड डीकोड करण्यात येत आहेत. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामधील तपासात मोठे यश मिळाले आहे. या भीषण स्फोटात गाडी चालवणारा मुख्य आरोपी डॉ. ...
यापूर्वी दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील कार स्फोट हे दहशतवादी मॉड्यूल असल्याचे तपासात समोर आले आहे. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी डॉक्टरांचा थेट संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. सायबर सेल आता चॅटबॉक्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांआधारे या संघटित कृत्यातील इतर सदस्यांचा शोध घेत असून मध्यप्रदेश, महाराष्ट्रापर्यंत या स्लीपर सेलचे धागेदोर असल्याचे समोर येत आहे.