राग, निराशा अन् हतबलता वाढतेय!

इंडियन सुपर लीग सुरू करण्यासाठी फुटबॉलपटूंची विनंती


नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन सुपर लीगला (आयएसएल) यंदाच्या मोसमात अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे फुटबॉलपटू, प्रशिक्षक, चाहत्यांचे नुकसान होत आहे. राग, निराशा अन् हतबलता वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आयएसएल ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची आर्त हाक भारतातील फुटबॉलपटूंकडून मारण्यात आली आहे.


अखिल भारतीय फुटबॉल संघटना व रिलायन्स यांच्या पुढाकाराने आयएसएल ही स्पर्धा १५ वर्षे सुरू होती, मात्र कराराचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे यंदा अद्याप या स्पर्धेचा श्रीगणेशा झालेला नाही. गेल्या आठवड्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून सांगण्यात आले की, आयएसएलच्या व्यावसायिक हक्कांसाठी मागवलेल्या प्रस्तावांना कोणतीही बोली मिळालेली नाही. ही बोली १६ ऑक्टोबरला मागवली होती. तसेच आगामी करार १५ वर्षांचा असणार होता.


भारतीय फुटबॉल संघातील स्टार खेळाडू संदेश झिंगन या वेळी भावुक होऊन म्हणाला की, “खेळाडू, प्रशिक्षक, चाहत्यांना स्पर्धा केव्हा सुरू होते याची प्रतीक्षा आहे. आम्ही खूप मेहनत केली. खूप काही दिले आहे. पण मोसम न खेळताच संपत चालला आहे.” पुढे तो सांगतो की, “संपूर्ण भारतीय फुटबॉल व्यवस्था अनिश्चिततेत आहे. स्वप्ने थांबली आहेत. भविष्य प्रश्नचिन्हाखाली आहे. प्रत्येक दिवस आम्ही थांबतो आहोत. भारतीय फुटबॉल पूर्वपदावर आणण्यासाठी कृतीची वेळ आली आहे.” सुनील छेत्री व गुरप्रीत सिंग संधू या फुटबॉलपटूंनीही सोशल माध्यमावर आपले मत व्यक्त केले आहे. ते सांगतात की, “आम्ही आयएसएलमध्ये खेळणारे व्यावसायिक फुटबॉलपटू एकत्र आलो आहोत. आमचा एकच संदेश आहे. आम्हाला खेळायचे आहे. तेही आता लगेच. आमचा राग, निराशा आणि वेदना आता बदलत चालली आहे. आमच्या प्रिय खेळाला पुन्हा उभारी देण्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्यास तयार आहोत.” अशा शब्दांत त्यांनी भावना मांडल्या.

Comments
Add Comment

‘मेजवानीसाठी बिर्याणी तयार आहे’, दहशतवाद्यांचा कोडवर्ड साधा पण अर्थ धक्कादायक!

नवी दिल्ली: दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या मोठ्या स्फोटाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या दहशतवादी

Toll Plaza Rules : खिशाला बसणार 'दुगना लगान'चा फटका! १५ नोव्हेंबरपासून टोल प्लाझावर नवा नियम; 'ही' चूक केल्यास दुप्पट शुल्क भरावे लागणार

नवी दिल्ली : जर तुम्ही वारंवार राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना सकाळी ९ वाजेपासून

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

दिल्ली स्फोटाच्या तपासाचे अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे नेतृत्व

नवी दिल्ली : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासाला आता वेग आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)

बांगलादेशला परतण्यास शेख हसीनांची सशर्त तयारी

नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण,