मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत आहे. मात्र यावेळी गोविंदाची तब्येत बिघडल्याने तो चर्चेत आला आहे. काल (११ नोव्हेंबर) रात्री गोविंदाला जुहू येथील क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असल्याची माहिती गोविंदाचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाला अचानक चक्कर आली आणि तो राहत्या घरी बेशुद्ध पडला. यानंतर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी गोविंदाच्या अनेक चाचण्या केल्या असून, त्याचे अहवाल अद्याप आलेले नसल्याने गोविंदावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
इजिप्त: कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल गटात एकूण २४३.७ गुणांसह युवा खेळाडू सम्राट राणाने अव्वल स्थान ...
दोन दिवसांपूर्वीच गोविंदा स्वतः कार चालवत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेल्या धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गेला होता. त्या भेटीनंतर त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला अशी चर्चा सुरू होती. मात्र काल रात्री गोविंदाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे त्याच्या तब्येतीबाबत चिंंता व्यक्त करण्यात येत आहे.