प्रतिनिधी: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाने नवीन सूचीबद्ध कंपन्यांमध्ये जोरदार सहभाग दर्शविला आहे एकूण गुंतवणूक ८७५२ कोटीची गुंतवणूक या नव्या कंपन्यांमध्ये झाली आहे असे प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ (Q2 FY26) रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत अलीकडील आयपीओमध्ये एकूण गुंतवणूक ८७५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे असे सोमवारी एका अहवालात म्हटले आहे. या नवीन गुंतवणूकदारांपैकी बहुतेक स्मॉलकॅप श्रेणीत गुंतवणूकीत प्रतिनिधित्व वाढले आहे असे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये या तिमाहीत १०६५५४ कोटी रुपयांचा गुंतवणूक प्रवाह दिसून आला आहे जो मागील तिमाहीत (Q1 FY26) ६६८६९ कोटी रुपयांचा प्रवाह आला होता असे व्हेंचुराने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यावेळी कर्ज योजनांमध्ये मागील तिमाहीत २०१५१६ कोटी रुपयांच्या प्रवाहाऐवजी ३१५६ कोटी रुपयांचा प्रवाह दिसून आला आहे.
अहवालानुसार, सगळ्याच हायब्रिड योजनांमध्ये मागील तिमाहीत ५८२३५ कोटी रुपयांचा निधी आला होता त्यानंतर या कालावधीत ४५५७० कोटी रुपयांचा निधी आला. आकडेवारीनुसार, जूनमध्ये २७२६९ कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर अखेरपर्यंत मासिक एसआयपी गुंतवणूकीने २९३६१ कोटी रुपयांचा उच्चांक गाठला आहे . कालांतराने उच्च परतावा देण्याची क्षमता असलेल्या लहान स्केलेबल व्यवसायांसाठी म्युच्युअल फंड उद्योगाच्या धोरणात्मक गुंतवणूक पर्यायांना हा डेटा अधोरेखित करतो.
अहवालात असेही नमूद केले आहे की जुलै-सप्टेंबर तिमाहीत निफ्टी५० मध्ये ३.६% वाढ घट झाली जी मागील तिमाहीत ८.५ % वाढली होती. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ४.१% आणि ४.६% घसरले आहे तर मागील तिमाहीत ते १२.८% आणि १७.३% वाढले होते. या तिमाहीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) इक्विटी मार्केटमध्ये ७६.६२ अब्ज रुपयांपर्यंत निव्वळ विक्रेते होते (मागील तिमाहीत ३८.६७ अब्ज रुपये निव्वळ खरेदीदार होते).
माहितीनुसार, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (Domestic Institutional Investors DII) निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीत २२१.११ अब्ज रुपयांचा निव्वळ प्रवाह बघता मागील तिमाहीत १४१.६२ अब्ज रुपये निव्वळ खरेदीदार होते. अहवालात नेमक्या शब्दात दिलेल्या निष्कर्षावर म्हटले गेले आहे की,' एप्रिल ते सप्टेंबर २०२५ पर्यंत, एफआयआयने ३७.९ अब्ज रुपयांचा निव्वळ निधी बाहेर काढला, तर डीआयआय ३६२.७ अब्ज रुपयांच्या गुंतवणूकीसह मजबूत खरेदीदार राहिले. गेल्या वर्षी याच कालावधीत, एफआयआयने ८९.७ अब्ज रुपयांचा निव्वळ निधी बाहेर काढला आणि डीआयआयने २३२.४ अब्ज रुपयांची गुंतवणूक केली'.






