गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी टीईटी परीक्षेकरिता आधुनिक तंत्राचा वापर

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस उमेदवारांसह इतर कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून काटेकोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामध्ये परीक्षार्थी उमेदवारांची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून ‘फोटो व्ह्यू’ आणि ‘कनेक्ट व्ह्यू’ या दोन नव्या प्रणाली परीक्षा परिषदेने उपाययोजनांमध्ये समाविष्ट केल्या आहेत.


राज्य परीक्षा परिषदेतर्फे यावर्षी २३ नोव्हेंबर रोजी ‘टीईटी’ आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘टीईटी’ अनिवार्य असल्याबाबत दिलेल्या निर्णयानंतर या परीक्षेचे महत्त्व वाढले आहे. तसेच, केंद्रप्रमुख भरती परीक्षेतही ‘टीईटी’ उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ‘टीईटी’च्या तुलनेत यंदा ‘टीईटी’च्या नोंदणीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.


‘टीईटी’मध्ये २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात अनेक गैरप्रकार उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीपासून राज्य परीक्षा परिषदेने गैरप्रकार रोखण्यासाठी अत्यंत काटेकोर उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी केलेल्या उपाययोजनांमध्ये यंदा दोन नव्या प्रणालींची भर घालण्यात आली आहे. यामध्ये ‘फोटो व्ह्यू’ प्रणाली उमेदवार पडताळणीसाठी, तर ‘कनेक्ट व्ह्यू’ प्रणाली वेगवान संपर्कासाठी वापरली जाणार आहे.


राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’चे प्रवेशपत्र उमेदवारांना १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत https://mahatet.in/ या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिलेल्या मुदतीत प्रवेशपत्र उपलब्ध करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेवारांची असेल, असे प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा

Nagpur News : नागपूरमध्ये २८ वर्षीय एअर होस्टेसची गळफास घेऊन आत्महत्या; मध्यरात्री प्रियकराशी फोनवर बोलली अन्...

नागपूर : नागपूरमधील लकडगंज (Nagrpur News) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. नुकतीच

Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात आता 'एआय'साठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महावितरणची आर्थिक पुनर्रचना करणार मुंबई : राज्याच्या प्रशास