बिहार निवडणुकीचा प्रचार संपला

दुसऱ्या टप्प्यासाठी १२२ जागांवर मंगळवारी मतदान


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा उडालेला धुरळा आता बसला आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मतदानासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी २० जिल्ह्यांमधील १२२ विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. रविवारी प्रचार संपला असून रात्रीच्या प्रचाराला आता वेग येणार आहे.


बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ३ कोटी ७० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १.९५ कोटी पुरुष आणि १.७४ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण १,३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भविष्य आजमावत आहेत. निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. तब्बल ४ लाखांहून अधिक सुरक्षा जवान विविध मतदान केंद्रांवर तैनात करण्यात येणार आहेत. नेपाळची सीमा ११ नोव्हेंबरपर्यंत सील करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये ६५ टक्के मतदान झाले होते. या वाढीव मतदानामुळे दुसऱ्या टप्प्यातील उरलेल्या प्रचाराच्या सभांना गर्दी जमविण्यासाठी सर्वच पक्ष मेहनत घेत होते. हा वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने जाणार असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. १४ नोव्हेंबरला बिहार निवडणुकाचा निकाल लागणार आहे.


संवेदनशील मतदान केंद्रे आणि वेळेत बदल
दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण ४५,३३९ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी ४,१०९ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यातील ४,००३ बूथ 'अतिसंवेदनशील' गटात मोडतात. नक्षलग्रस्त भागांचा विचार करून, कटरिया, बेलहर, चैनपूर, कुटुंबा, औरंगाबाद, शेरघाटी यांसारख्या विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंतच चालणार आहे, तर इतर ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

चंद्रयान-२ पुन्हा चर्चेत; इस्राोने शेअर केली मोठी माहिती !

नवी दिल्ली : सहा वर्षांपूर्वी प्रक्षेपित झालेल्या चंद्रयान-२ बद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)

डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत असाल तर सावधान !

आम्ही जबाबदार नाही; सेबीचा सतर्कतेचा इशारा नवी दिल्ली  : बदलत्या काळानुसार सोन्यातील गुंतवणुकीच्या

असीम मुनीर यांना विशेष अधिकार देण्यावरून पाकिस्तानात विरोधकांचे देशव्यापी आंदोलन

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २७ व्या संविधान सुधारणा विधेयकामुळे तणाव निर्माण झाला आहे. संविधान सुधारण्यानंतर

भारताच्या मुलीची ऐतिहासिक कामगिरी! तिरंदाजी स्पर्धेत भारतीय एबल-बॉडी ज्युनियर संघात निवड

मुंबई: देणाऱ्याने देताना काहीतरी विचार केलाच असेल, असं आपण नेहमीच म्हणतो. मग ते सुख असो किंवा दु:ख... आणि याचा अनुभव

आयसिसच्या तीन अतिरेक्यांना अटक, गुजरात ATS ची धडक कारवाई

अहमदाबाद : गुजरात एटीएसने 'आयसिस'शी संबंधित तीन अतिरेक्यांना अटक केली आहे. हे अतिरेकी देशात मोठा घातपात करण्याची

'हे' आहे देशातील पहिले शाकाहारी शहर! जाणून घ्या सविस्तर

गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण