कर्नाटकमधील मच्छीमारांची महाराष्ट्रात घुसखोरी, सरकारी यंत्रणेची लगेच कारवाई


देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाई करीत नौका जप्त केली आहे. ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तथा सुधारणा अधिनियम २०२१ च्या तरतुदींनुसार करण्यात आली आहे.


देवगडसमोर सुमारे १० वाव अंतरावर नियमित गस्तीदरम्यान ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १०.४५ वाजता महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणारी नौका आढळली. चौकशी करुन घुसखोरी करणारी नौका जप्त करण्यात आली. ही कारवाई मत्स्य विकास विभागाचे अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांनी केली.


कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रासाठी परवाना असलेली नौका “भारद्वाजा” (नोंदणी क्र. IND-KA-02-MM-4171) ही श्री. अशोक गोपाल सालिन (रा. मल्लपी, पो. कोडूवूर, उडुपी, कर्नाटक) यांच्या मालकीची असून, ही नौका महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात अनधिकृतपणे मासेमारी करताना आढळली. या नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी उपस्थित होते. नौका ताब्यात घेऊन ती देवगड बंदरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. नौकेवर आढळलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू असून, याबाबतचा अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. सुनावणीअंती नौकेच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


Comments
Add Comment

मुंबईत एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना 'दे धक्का'

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची

'हे' आहे देशातील पहिले शाकाहारी शहर! जाणून घ्या सविस्तर

गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण

शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख भाजपच्या वाटेवर

डोंबिवली : शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाची

उबाठाच्या ताब्यातील गड भाजपा करणार काबिज

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विशेष बैठका आणि सभा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांसोबत पदाधिकाऱ्यांना

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा