'वंदे भारत'ची दिवाळीत बक्कळ कमाई

पुणे (प्रतिनिधी) : जलद सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 'वंदे भारत'ला दिवाळीमध्ये प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे ते नागपूर (अजनी), पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या तीन वंदे भारत रेल्वे गाड्या आहेत.


दिवाळीमध्ये १७ ते २७ ऑक्टोबर या दहा दिवसांत या तीनही रेल्वे गाड्यांच्या एकूण ३० फेऱ्या झाल्या. २३ हजार ८११ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. त्यातून रेल्वेला दोन कोटी ९४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. नागपूरला जाणाऱ्या वंदे भारत गाडीला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.


दिवाळीला प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून जास्तीच्या रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांना रेल्वेमध्ये जागा मिळणे कठीण झाले. ज्या गाड्यांचे तिकीट उपलब्ध होते, त्या गाड्यांना प्रवाशांनी प्राधान्य दिले. वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत जास्त असूनही या गाड्यांना मोठा प्रतिसाद लाभला आहे.



कुठल्या वंदे भारतला जास्त प्रतिसाद लाभला?
अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारतला सर्वाधिक ७ हजार ७२१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला १ कोटी ८ लाख ९१ हजार २५२ रुपये उत्पन्न मिळाले. पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारतलाही ६ हजार ६६६ प्रवाशांनी प्रवास करीत ९१ लाख ७२ हजारांचे उत्पन्न गाठले. या गाडीला सरासरी १३० टक्के प्रवाशांची उपस्थिती होती. अन्य काळात या गाड्यांचे तिकीट दर जास्त असून, त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद तुलनेने कमी असतो; मात्र दिवाळीच्या गर्दीमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Comments
Add Comment

Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन

उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; व्हीव्हीपॅट नाही, तर मतपत्रिका हवी!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर याचिका नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट

पार्थ पवार जमीन घोटाळा: अजितदादा काय म्हणतात, प्रत्यक्ष 'ऐका'!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्याने राजकीय

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

रांजणी येथील ड्रायपोर्टसाठी सकारात्मक काम करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा अशी मागणी या भागातील

काँग्रेसमध्ये 'सपकाळ विरुद्ध केदार' वाद शिगेला!

नागपूरमध्ये गटबाजीचा स्फोट; प्रदेशाध्यक्षांनी इच्छुकांच्या 'मुलाखती'ची बैठकच ठरवली 'अवैध'! नागपूर : नागपूर