काँग्रेसमध्ये 'सपकाळ विरुद्ध केदार' वाद शिगेला!

नागपूरमध्ये गटबाजीचा स्फोट; प्रदेशाध्यक्षांनी इच्छुकांच्या 'मुलाखती'ची बैठकच ठरवली 'अवैध'!


नागपूर : नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्यातील राजकीय संघर्ष आता थेट चव्हाट्यावर आला आहे. आगामी निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष अश्विन बैस यांनी घेतलेली बैठक प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी अवैध ठरवल्यामुळे पक्षाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील ही गटबाजी उघड झाल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम अश्विन बैस यांनी शुक्रवारी जाहीर केला होता. विशेष म्हणजे, बैस यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती ही केदार यांच्याच पुढाकाराने झाली होती आणि या बैठकीमागेही केदार गटाचाच हात असल्याची चर्चा आहे.


नागपूर काँग्रेसमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुनील केदार यांच्या कार्यपद्धतीवर रोष आहे. जिल्हा काँग्रेसची सारी सूत्रे ते आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अलीकडेच, जिल्हाध्यक्ष निवडीतही त्यांनी अनुभवी बाबा आष्टनकर यांना केवळ सात महिन्यांत पदावरून हटवून, नवखे आणि एकही निवडणूक न लढलेले अश्विन बैस यांना अध्यक्ष केल्याने नाराजी वाढली होती.


या गटबाजीला खतपाणी मिळू नये म्हणून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी नागपूरचे निवडणूक निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यामार्फत ही बैठक रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, तरीही स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांचे आदेश धुडकावून लावत मुलाखतीचा कार्यक्रम पुढे रेटला, ज्यामुळे हा संघर्ष चव्हाट्यावर आला.


या बैठकीचा प्रोटोकॉल पूर्णपणे पायदळी तुडवण्यात आला होता. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, माजी आमदार, माजी अध्यक्ष किंवा पक्षाने नेमलेल्या जिल्हा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपैकी कोणालाही या बैठकीसाठी बोलावले नव्हते. फक्त सुनील केदार, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासह केदार समर्थकांनाच बोलावून मुलाखती घेण्यात येणार होत्या.


याची माहिती मिळताच काही पदाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली. सपकाळ यांनी यावर तातडीने दखल घेत उदय मेघे आणि अशोकराव बोबडे यांना निरीक्षकांसोबत नागपूरला पाठवले.


मेघे आणि बोबडे यांनी ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत जाऊन ती अवैध ठरवली. त्यांनी उपस्थित स्थानिक नेत्यांना अध्यक्षांचा स्पष्ट निरोप कळवला: "परस्पर, नियमबाह्य बैठका घेऊ नका आणि गटबाजीला खतपाणी घालू नका, तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना डावलू नका." विशेष म्हणजे, हा निरोप देऊनही बैठकीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि त्यानंतरही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्याची माहिती आहे.


सुनील केदार यांच्या मनमानी कारभाराची ही काही पहिलीच वेळ नाही. रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी परस्पर रश्मी बर्वे यांचे नाव जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा उघडपणे प्रचार केला होता. रामटेक आणि हिंगणा हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने मित्रपक्षांसाठी सोडले असतानाही, केदार यांनी आपले समर्थक उमेदवार रिंगणात उतरवले होते. आता निवडणुकीच्या तोंडावरच गटबाजीचा हा नवीन अंक सुरू झाल्याने, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार हे नक्की.

Comments
Add Comment

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट