Buldhana Horror : बुलढाण्यात थरार! मुलाने कुऱ्हाडीने आई-वडिलांची हत्या करून स्वतःही संपवले जीवन, २ चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला

बुलढाणा : नात्यांना काळीमा फासणारी एक हादरवणारी आणि हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे घडली आहे. शेतीच्या वादातून एका मुलाने दारूच्या नशेत आपल्या जन्मदात्या आई आणि वडिलांची क्रूर हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव डुकरे येथील एका कुटुंबात शेतीच्या तुकड्यावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास मुलगा दारूच्या नशेत घरी आला. त्याने याच वादातून आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले. वार इतके क्रूर होते की आई आणि वडिलांचा जागीच मृत्यू झाला. जन्मदात्यांची निर्घृण हत्या केल्यानंतर, या कृत्याच्या धक्क्याने किंवा पश्चात्तापाने त्याने घरामध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



व्यसनाच्या विळख्याने घडवले तिहेरी हत्याकांड


अत्यंत शांत आणि साधे म्हणून ओळखले जाणारे चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे हे गाव गुरुवारी रात्री एका भीषण तिहेरी हत्याकांडाने हादरले. दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाचे अस्तित्वच एका क्षणात संपले आहे. या हादरवून टाकणाऱ्या घटनेत वडील सुभाष दिगंबर डुकरे (६७) आणि आई लता सुभाष डुकरे (५५) यांची निर्घृण हत्या झाली आहे, तर आरोपी मुलगा विशाल सुभाष डुकरे (३२) याने स्वतः गळफास घेऊन आपले जीवन संपवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण कृत्यामागे विशाल डुकरेचे दारूचे व्यसन हेच मूळ कारण होते. विशालला दारूचे व्यसन जडल्यापासून घरात वारंवार वाद आणि भांडणे होत होती. या व्यसनाने कुटुंबाची शांतता हिरावून घेतली होती. गावकरी सांगतात की, विशाल लहानपणी अत्यंत हुशार आणि शाळेत पहिला येणारा विद्यार्थी होता. मात्र, हळूहळू तो दारूच्या नादी लागून बिघडत गेला. कामधंदा सोडून तो दिवसभर दारूच्या नशेत असायचा. आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करणे हे त्याचे रोजचे झाले होते. व्यसनाच्या या विळख्यामुळे त्याचे लग्न मोडले, मित्र दूर झाले आणि कुटुंबातील शांतता कायमची हरपली. अखेर दारूच्या नशेतच त्याने कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्यांची क्रूर हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवले. या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चिखली घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. व्यसनाच्या विळख्यात अडकून कुटुंबाचे झालेले हे भीषण हत्याकांड संपूर्ण जिल्ह्याला चटका लावून गेले आहे.



चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला


या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही वेळातच पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अमोल गायकवाड आणि सुधीर पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक टीमने तातडीने तपासणी सुरू केली आहे. मृतांमध्ये वडील सुभाष दिगंबर डुकरे (६७), आई लता सुभाष डुकरे (५५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (३२) यांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेतील एक दिलासा देणारी बाजू समोर आली आहे, ती म्हणजे मृतांच्या कुटुंबातील दोन लहान मुले सुदैवाने वाचली. मृतक आरोपी विशालचा मोठा भाऊ शरद पाटील यांचा ११ वर्षांचा मुलगा युवराज आणि ६ वर्षांची मुलगी आर्या, हे दोघेही 'त्या' रात्री घरी नव्हते. गावात बोलले जाते की, या दोन्ही चिमुकल्यांना आजी-आजोबांवर (सुभाष आणि लता) खूप लळा होता आणि ते रोज रात्री त्यांच्याकडेच झोपायला जात असत. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते आजी-आजोबांकडे गेले नव्हते. त्यांच्या याच अनुपस्थितीमुळे त्यांच्यावरील मोठे संकट टळले आणि त्यांचे प्राण थोडक्यात बचावले. या घटनेमुळे सावरगाव डुकरे गावात खोलवर शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

काँग्रेसमध्ये 'सपकाळ विरुद्ध केदार' वाद शिगेला!

नागपूरमध्ये गटबाजीचा स्फोट; प्रदेशाध्यक्षांनी इच्छुकांच्या 'मुलाखती'ची बैठकच ठरवली 'अवैध'! नागपूर : नागपूर

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

मुख्यमंत्र्यांकडून चौकशी समितीची घोषणा, स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आरोप पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे

'टीईटी परिक्षेबाबत अफवांवर विश्वास नको'

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

मुंबई : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क

मुख्यमंत्री असताना कधी घराबाहेर पडले नाही, पराभवानंतर आता लोकांमध्ये जाण्याची जाणीव झाली!

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांचे धारदार टीकास्त्र नागपूर : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या

राज ठाकरे संतापले; निष्क्रिय शाखाध्यक्षांना थेट काढून टाकण्याचे आदेश

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कमालीचे संतप्त