मेट्रो प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्य सरकार दरवाढीच्या तयारीत

मुंबई : रेल्वे प्रमाणे मेट्रोलाही मुंबईकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मुंबईत २०१४ पासून सुरू झालेले मेट्रोचे जाळे आता विस्तारत जात आहे. आणि त्याला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसादही मिळत आहे. नुकत्याच सुरु झालेल्या भुयारी मेट्रोला ही मुंबईकरांनी पसंती दर्शवली. मात्र आता हा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकार मेट्रोच्या भाड्यात वाढ करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. दरवाढ लक्षणीय असेल, तर मुंबईकरांना इतर पर्यायांचा विचार करावा लागू शकतो. सध्या मेट्रो 2A आणि 7 मार्गिकांवर 3 ते 12 किलोमीटर प्रवासासाठी 20 रुपये भाडे आकारले जाते, तर भुयारी मेट्रोसाठी हेच अंतर 40 रुपयांपर्यंत जाते. मेट्रो 1 वरही 8 ते 11.4 किलोमीटरसाठी 40 रुपये आकारले जातात.



दरवाढ कोणत्या मार्गिकांसाठी होणार?


राज्य सरकारने मेट्रोच्या भाडे निर्धारण समितीच्या स्थापनेसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे मेट्रो 2A (अंधेरी पश्चिम–दहिसर) आणि मेट्रो 7 (गुंदवली–दहिसर) या मार्गिकांवरील भाडेवाढ जवळपास निश्चित मानली जात आहे. एमएमआरडीएने हा प्रस्ताव मागील ऑगस्टमध्येच राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने त्यास मंजुरी देऊन केंद्राच्या सॉल्ट पॅन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. केंद्राच्या परवानगीनंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली भाडे निर्धारण समिती स्थापन केली जाणार आहे.



दरवाढीमागील कारण काय आहे?


सध्या एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांवर दररोज सुमारे 3 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षी प्रवासी संख्या 9 लाखांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात प्रवासी संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने उत्पन्नात तुटवडा जाणवतो आहे, आणि खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे एमएमआरडीएला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच, मुंबईतील इतर मेट्रो मार्गिकांचे भाडे या मार्गिकांपेक्षा जास्त आहे. या तफवातीबरोबरच वाढत्या आर्थिक तुटीमुळे मेट्रो 2A आणि 7 मार्गिकांच्या भाडेवाढीचा प्रस्ताव प्रशासन गांभीर्याने विचारात घेत आहे.

Comments
Add Comment

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई