स्थानिक निवडणुकांत मनसेपासून काँग्रेस एक हात लांबच राहणार

महाराष्ट्रात उत्तर भारतीय, अल्पसंख्याक नागरिकांना लक्ष्य


मुंबई : स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचा मोठा गाजावाजा होत असला तरी मविआतील काँग्रेसला मनसेशी जवळीक साधण्यास स्वारस्य नसून मनसेला मविआत येणार अथवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना दुसरीकडे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे, सध्या ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज ठाकरे मविआत येतील, अशी चर्चा जोर धरत आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेसोबतची युती काँग्रेसला परडवणारी नाही. त्यामुळेच, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत काँग्रेसने मनसेसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजले असून पुढील काळात राजकीय घडामोडी पाहायला मिळतील. त्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती राहील की नाही, महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढवणार की नाही, हेही पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्यातच, मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार नोंदणीवरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हेही आयोगावर टीका करत मविआसोबत असल्याचे दिसून येते. मात्र, मविआमध्ये मनसेला स्थान असेल की नाही, याबाबत काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे.


बिहार निवडणुकांच्या तोंडावर मनसेशी सलगी काँग्रेसला न परवडणारी


इंडिया आघाडीत असलेल्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यास काँग्रेस तयार आहे. मात्र, मनसेसोबत कुठल्याही परिस्थितीती आघाडी होणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मनसेकडून उघडपणे उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक नागरिकांना लक्ष्य केलं जातं, त्यांच्याविरुद्ध भूमिका घेतली जाते. त्यामुळे, मनसेसोबतची आघाडी पक्षाला परवडणारी नाही. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते नुकसानदायक असल्याचेही काँग्रेस नेत्यांचे मत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी नुकतेच निवडणूक आयोग आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात काँग्रेस नेतेही सहभागी झाले होते. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक हात लांबच राहणे पसंत केल्याचे दिसून आले. त्यामुळे, ठाकरे बंधू एकत्र आले तरी राज ठाकरे महाविकास आघाडीत असतील की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

Pune News : १ तास कुलूप लावून... हिंजवडीत निष्काळजीपणाचा कळस; सेविका अन् मदतनीसांनी २० चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडलं;

पुणे : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी (Hinjawadi, Pune) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना

Nashik News : नाशिक हादरले! ओझरच्या चंपाषष्टी उत्सवात बारागाड्यांच्या चाकाखाली चिरडून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ओझर गावातून (Ozar, Nashik) एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर आली आहे.

पुण्यातील दोन नवीन मेट्रो मार्गिकांना मंजुरी

पुणे (प्रतिनिधी) : गेल्या काही महिन्यांपासून पुणे मेट्रोचा विस्तार झपाट्याने होत आहे. संपूर्ण पुणे शहरात

Satara : काळजाचा ठोका चुकवणारा थरार! महामार्गावर बेदरकार मिनी ट्रॅव्हल्सचा कहर; एकाचा जागीच मृत्यू, थराराचा व्हिडिओ व्हायरल

सातारा : साताऱ्यातून (Satara) एक अत्यंत धक्कादायक आणि भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील बरड येथे संत

Sambhajinagar : धक्कादायक! जेवायला बसले अन् गवारच्या भाजीत आढळली पाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये २८ विद्यार्थ्यांना विषबाधा;

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे.

'देवेंद्र' अशी हाक ऐकताच सर्वांचे कान टवकारले! मुख्यमंत्र्यांना मेळघाटातील प्रचारसभेत भेटलेली 'ती' महिला कोण?

अमरावती : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील