बिहार मतदान: लोकशाहीच्या उत्सवाचा आज पहिला टप्पा, मतदान करण्यासाठी मोदींनी केले आवाहन!

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रकियेला सुरुवात झाली आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात साधारण ३७.५ दशलक्ष मतदार १ हजार ३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.


बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन दिले आहे. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "आज बिहारमध्ये लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांना माझे आवाहन आहे की त्यांनी पूर्ण उत्साहाने मतदान करावे. या प्रसंगी, राज्यातील सर्व तरुण मतदारांचे विशेष अभिनंदन जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत..."


बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी एकूण ४५ हजार ३४१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी ३६ हजार ७३३ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानात १०.७२ लाख नवीन मतदार आहेत. ज्यात १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या ७.३८ लाख एवढी आहे.





निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील मधेपुरा, सहरसा, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपालगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पाटणा, भोजपूर आणि बक्सर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.

Comments
Add Comment

क्यूएस क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांची घसरण

नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांची जागतिक क्रमवारी ठरविणाऱ्या क्यूएस क्रमवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यंदा

बिहारमध्ये आज मतदान

पहिल्या टप्प्यात अनेक मातब्बरांचे भविष्य मतदानपेटीत बंद होणार नवी दिल्ली  : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या

प्रसिद्ध अभिनेत्रीला अश्लील फोटो, Video पाठवून मानसिक त्रास, आरोपीला अटक, काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीला फेसबुकवर वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याबद्दल ऑनलाइन छळाची

८वा वेतन आयोग मंजूर पण सरकारी कर्मचारी धास्तावले; कारण काय?

केंद्राचा मोठा निर्णय: पगारवाढीऐवजी आता 'कामकाजावर' वेतन! नवी दिल्ली : देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि

Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly