मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन महापालिका व सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या सोमवार १० नोव्हेंबरपासून बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव हे आपल्या कार्यालयात बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
बेस्ट उपक्रम आणि स्व मालकीच्या ३ हजार ३३७ बस गाड्या कायमस्वरूपी राखाव्यात. बेस्ट उपक्रमात सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीची थकीत रक्कम त्यांना तातडीने देण्यात यावी. बेस्ट कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी व महापालिका समकक्ष वेतनमान याचा समावेश असलेला प्रलंबित वेतन करार तातडीने करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या पूर्ण करून घेण्याकरता आपण सोमवारपासून बेस्ट वर्कर्स युनियन कार्यालय केनेडी पूल येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचे सांगितले .
येत्या ३० नोव्हेंबर रोजी बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या फक्त २५१ बस गाड्या शिल्लक राहणार आहेत मुंबईकर जनतेस गेलीस ७५ वर्षापासून अधिक काळापासून मिळणारी अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा बंद पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बेस्ट बससेवा हि मुंबईची जीवन वाहिनी आहे मुंबईच्या कानाकोपऱ्यात अत्यावश्यक सेवा अल्पदरात नियमितपणे सुरू राहणे ही प्रवासी आणि मुंबई शहराची मूलभूत गरज असल्याचे त्यांनी पुढे सांगितले त्याचबरोबर संघर्ष कामगार कर्मचारी युनियन तर्फे ही कंत्राटी बस कामगारांना कायमस्वरूपी करणे तसेच त्यांना समान कामाला समान दाम ही न्याय हक्काची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून आपण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले .