Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार, मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्य सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) ही योजना सध्या सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी (Most Popular and Successful) योजना म्हणून ओळखली जाते. आता याच लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक मोठी आणि दिलासादायक घोषणा (Relief Announcement) केली आहे. महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडक्या बहिणींच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. तटकरे यांनी 'एक्स' (X) पोस्टद्वारे माहिती दिली आहे की, ४ नोव्हेंबर (सोमवार) पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच २ ते ३ दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे. यासोबतच, मंत्री तटकरे यांनी योजनेच्या KYC (ई-केवायसी) बद्दलही महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहावा यासाठी, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत त्यांनी जारी केली आहे. ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच महिलांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे. या घोषणेमुळे दिवाळीनंतर लांबणीवर गेलेला हप्ता अखेर खात्यात जमा होणार असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.



लाडक्या बहिणींसाठी दिवाळीनंतरची मोठी भेट; उद्यापासून सन्मान निधी वितरित


मंत्री आदिती तटकरे यांनी 'एक्स' (X) पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती!" त्यांनी माहिती दिली की, ऑक्टोबर महिन्याचा 'सन्मान निधी' वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून (५ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे. तटकरे यांनी महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने ही सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या सुरू असल्याचे नमूद केले. या वाटचालीस खंड पडू नये, यासाठी त्यांनी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नम्र विनंती केली आहे की, सर्व लाडक्या बहिणींनी १८ नोव्हेंबरच्या आधी या संकेतस्थळावर E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसी (e-KYC) न केल्यास पुढील हप्ते मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.



अशी करा e-KYC प्रक्रिया ?



  • लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्यावी.

  • लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे.

  • तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) नोंदवा.

  • आता कॅप्चा कोड (Captcha Code) तिथे नोंदवा.

  • आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करावे.

  • आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP नमूद आल्यावर तो Submit करावा.

  • त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील
    १. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
    २. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

  • शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

Comments
Add Comment

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह

Pandharpur Temple | मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिरात भाविकांसाठी विशेष नियोजन; १३ व १४ जानेवारीला दर्शन वेळापत्रकात बदल

पंढरपूर : मकरसंक्रांती आणि भोगी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात

पीएमपीएमएल प्रशासनाचा मोठा निर्णय; 'हे' दोन दिवस प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ ६०० बस शिल्लक

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रकिया सुरुळीत पर पाडण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाचा मोठा