भाजप-राष्ट्रवादीची युती, एकनाथ शिंदे पडले एकाकी!

बदलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या कुळगाव - बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत आपल्याच पक्षाची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पाच वर्षे एकत्र नांदलेल्या सेना-भाजप युतीमधील अंतर्गत वादाला ग्रहण लागले आहे. बदलापुर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुती फूट पडली असून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती जाहीर केल्याने एकनाथ शिंदे गटाला एकाकी पाडले आहे.


दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी युती नकोच, असे स्पष्टपणे सांगत असताना दोन्ही पक्षांतील वरिष्ठ पातळीवरील नेते मात्र युती ठेवण्याबाबत अजूनही अनुकूल असलेले दिसतात. त्यातच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युती जाहीर केल्याने अंतर्गत वाद आणखी चिघळला आहे.


पुढची पाच वर्षे आपलीच सत्ता मिळवण्यासाठी सेना-भाजपचे नेते एकमेकांच्या समोर आता सरसावले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीसाठी एकत्र येण्यास तयार नाहीत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांना एकमेका विरोधात दंड थोपटले आहेत.


महाविकास आघाडीची अद्याप कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. मागील लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार कपिल पाटील यांच्यावर मतदार नाराज होते. त्यामुळे मतदारांना बदल पाहिजे होता. त्यातच काही त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी पाहिजे, तशी मदत न केल्याने लोकांना बदल असलेल्या लाटेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बाळू मामा म्हात्रे हे निवडून आल्याचे बोलले जाते. मात्र त्यानंतर खासदार म्हात्रे यांनी देखील बदलापूरकडे दुर्लक्ष केल्याचे समजते. बदलापूरच्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाल्यास त्यांना फायदा होऊ शकतो.



२०१५ च्या निवडणुकीतील पक्ष बलाबल


२०१५ मध्ये कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ४७ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये शिवसेनेला २४ जागा , भाजपाला २० जागा , राष्ट्रवादीला दोन जागा आणि अपक्ष एक अशी पक्षीय बलाबल होते. त्यावेळी भाजपा आणि सेनेची युती होती .


त्यानंतर २०२० मध्ये कोरोना असल्याने निवडणूक रखडल्या होत्या . तब्बल पाच वर्षे या निवडणूक प्रलंबित राहिल्या. मात्र आता पुन्हा सर्व पक्षाचे कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागेल आहेत. त्यातच जनतेतून नगराध्यक्ष होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणार आहे. सद्यस्थितीत तरी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा आहे.

Comments
Add Comment

...तर मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची

बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६

मुंबई महापालिकेच्या या दोन विभागांना लाभले कायम सहायक आयुक्त

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक

निवडणूक आयोग 'सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं'! राज ठाकरेंचा हल्लाबोल

पत्रकार परिषद पाहून मनसे अध्यक्ष संतापले; म्हणाले, 'आयोग निष्पक्ष नाही, महाराष्ट्रातील जनतेचा हा ढळढळीत

Breaking News : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला होणार मतदान

राज्यात आचारसंहिता लागू २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतींसाठी होणार मतदान २ डिसेंबरला मतदान, ३

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द, कोणाला मिळणार फायदा?

मुंबई : राज्यातील नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर अनुज्ञेय क्षेत्रावरील जमिनींसाठी