आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; जनता महायुतीसोबत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांना चपराक


पंढरपूर :“आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मो o-.र्चे काढून सत्ता मिळत नाही; महाराष्ट्रात विकास करणाऱ्यांनाच जनता साथ देते.” राज्याच्या विकासाचा चेहरा आणि जनतेला दिलेल्या वचनांची आठवण करून देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून विरोधकांवर विरोधकांवर थेट राजकीय प्रहार केला.
कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला आणि सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. याप्रसंगी त्यांच्यासोबत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री असताना आम्ही अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. महायुती सरकारने विकासकामांना गती दिली असून अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. महायुती सरकारची दुसरी इनिंग सुरू आहे. राज्यातील जनतेला विकास कोणी केला हे स्पष्ट माहीत आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही मोर्चे-आंदोलने काढली तरी आमच्या विजयावर परिणाम होणार नाही. आमचा अजेंडा महाराष्ट्राच्या विकासाचा आहे.” असे जोरदार प्रत्युत्तर देत त्यांनी विरोधकांच्या मोर्चातील हवा काढून टाकली.
कार्तिकी एकादशीच्या पूजनाचा मान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिंदेंनी शेतकरी, कष्टकरी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण सुख-समृद्धीसाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. ते पुढे म्हणाले, “महायुती सरकारने जनतेचा विश्वास जिंकला आहे. विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही जनता आमच्या पाठीशी ठाम उभी राहील.” महायुतीचा भगवा झेंडा फडकेला असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज देऊन रक्कम खात्यात जमा केली जात आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही.” हा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. नगरविकास विभागाने चंद्रभागा नदीसाठी १२० कोटींचा टप्पा मंजूर केल्याची माहिती देत त्यांनी सांगितले.


बळीराजाला सुखी ठेवा, एकनाथ शिंदेचे पांडुरंगाला साकडे


बळीराजावर आलेले अरिष्ट दूर कर, त्यांना सुख व समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री शिंदे पांडुरंगाला घातले. श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. राज्यातील शेतकऱ्यावर मोठे संकट आलेले आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना
तातडीची मदत म्हणून शासनाने ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलेले आहे.


श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केलेला होता.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी