कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळाला शासकीय पूजेचा मान!

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार आज पहाटे विठ्ठलाची शासकीय पूजा पार पडली. यावर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून हा मान एकनाथ शिंदे यांना मिळाला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पूजा केली. उपमुख्यमंत्र्यांसोबतच रामराव बसाजी वाले‌गावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर (रा. हिमायतनगर जि. नांदेड) या वारकरी दाम्पत्यांला यावर्षी पूजा करण्याचा मान मिळाला.


यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शासकीय महापूजेनंतर पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात झाली आहे. भागवत एकादशीनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरात दाखल झाले असून त्यांच्या मुखात हरी नामाचा जयघोष असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच

आचरसंहिता लागू होताच रोकड जप्त! पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा

पुणे: महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य