स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी कंत्राट संपुष्टात,पण मुदत वाढीला तारीख पे तारीख

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील स्मशानभूमी आणि दफनभूमींच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने खासगी संस्थांची नेमणूक केली असल तरी प्रत्यक्षात याची स्वच्छता राखली जात नाही. उलट यासाठी नेमलेल्या संस्थेलाच आता कंत्राट संपूनही कालावधी वाढवून दिला जात आहे. ३६ महिन्यांकरता नेमलेल्या संस्थेचा ४५ महिन्यांचा कालावधी करण्यात आला आहे. त्यामुळे १५ कोटी रुपयांचे काम आता तब्बल १८ कोटींवर जावून पोहोचले आहे. या कामांसाठी महापालिकेच्यावतीने नवीन कंत्राटदाराची निवड झाल्याने जुन्या संस्थेलाच कालावधी वाढवून दिला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



मुंबई महापालिकेच्या अखत्यारित एकूण ६८ स्मशानभूमी असून त्यातील ५० स्मशानभूमींची दैनंदिन सफाई राखण्यासाठी ऑगस्ट २०२१मध्ये कंत्राटदाराची तीन वर्षांकरता निवड करण्यात आली होती. यासाठी १५.३१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे यासाठी सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली होती. या संस्थेला ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत कालावधी असल्याने यापूर्वी यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु यासाठीची निविदा प्रक्रिया वेळेत न झाल्याने विद्यमान संस्थेला कालावधी वाढवून दिला जात आहे.यासाठीचा वाढीव कालावधी मार्च २०२५ संपुष्टात आल्यानंतरही पुढील कालावधीसाठीही मुदत वाढवून दिली आहे
Comments
Add Comment

मुंबईत जमिनीखाली १८ मीटर खोलवर भुयारी मेट्रोला मिळणार बीएसएनएलचे नेटवर्क ?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील काही दिवसांपूर्वी जेव्हीआरएल-बीकेसी-कफ परेड या भुयारी मेट्रो

भांडुप उषा नगर नाल्यावरील पुलांची कामे धिम्या गतीने, पण खर्च वाढला एवढा

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने भांडुप येथील उषा नगर नाल्यावरील जुन्या पुलांचे बांधकाम पाडून

वाहतूक कोंडी संपणार?

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाला गती मुंबई  : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्यान नवीन जोडमार्ग

कलिना आणि वांद्रे, पूर्व विधानसभा क्षेत्र भाजपला अनुकूल

आपल्या राजकीय वाटचालीबाबत बोलतांना उत्तर पूर्व जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे सांगतात, राजकारणात यायचे असा

आजपासून धारावीकरांसाठी विशेष मोहीम

प्रलंबित सर्वेक्षणात भाग घेता येणार १५ नोव्हेंबरपर्यंत मोहीम राबविली जाणार मुंबई  : विविध अन्य कारणांमुळे

शाळेत तिसरीपासूनच ‘एआय’चे धडे

मुंबई  : केंद्र सरकारने देशातील सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल