दिल्ली विमानतळावर भारतीय महिलेकडे मिळाला ९७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा!

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील महिला प्रवाशांनी गांजा तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे. ताजी घटना ३० ऑक्टोबर २०२५ ची आहे. फ्लाइट क्रमांक SG-८८ ने बँकॉकहून दिल्लीला आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाकडून ९७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (गांजा) जप्त केला आहे. ही माहिती दिल्ली कस्टम विभागाने दिली आहे.


अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी फ्लाइट क्रमांक SG-८८ ने आलेल्या महिला प्रवाशाला कस्टम ग्रीन चॅनेल ओलांडल्यानंतर अटक करण्यात आली. तिच्या सामानाच्या एक्स-रे तपासणी दरम्यान संशयास्पद प्रतिमा आढळून आल्या. सविस्तर तपासणीनंतर, कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या सामानातून हिरव्या रंगाचे पदार्थ असलेले व्हॅक्यूम-सील केलेले हायड्रोपोनिक गांजाची पॅकेट आढळून आले. या पॅक केलेल्या सामानाचे एकूण वजन ९७० ग्रॅम होते. या अंमली पदार्थाचा स्रोत आणि प्राप्तकर्ता कोण आहे हे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.


मागील आठवड्यात सुद्धा बँकॉकहून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांनी फणस वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिथिन बॅगस् मधून सुमारे पाच किलो गांजा तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये एकूण सहा जणांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे असलेल्या ड्रग्जची किंमत बाजारात ४.९४ कोटी रुपये एवढी होती.

Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत