भारत - अमेरिकेत १० वर्षांचा संरक्षण करार

क्वालालंपूर : भारत आणि अमेरिकेने संरक्षण क्षेत्रात पुढील दहा वर्षांसाठी सहकार्य वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. हा करार मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत स्वाक्षरीत झाला. या करारानंतर हेगसेथ म्हणाले की, “हा दहा वर्षांचा अमेरिका-भारत संरक्षण आराखडा आमच्या भागीदारीला अधिक बळ देईल आणि प्रादेशिक स्थैर्य व प्रतिकारशक्तीचा पाया ठरेल. आम्ही समन्वय, माहितीची देवाणघेवाण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करत आहोत. आमचे संरक्षणसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत.”


राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले, “क्वालालंपूरमध्ये अमेरिकेचे समकक्ष पीट हेगसेथ यांच्यासोबत अत्यंत फलदायी चर्चा झाली. आम्ही 'अमेरिका-भारत प्रमुख संरक्षण भागीदारी आराखडा' या दहा वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार दोन्ही देशांमधील आधीच मजबूत असलेल्या संरक्षण भागीदारीला नवे युग देईल. हा आराखडा भारत-अमेरिका संरक्षणसंबंधांना धोरणात्मक दिशा देईल आणि आमच्या वाढत्या रणनीतिक सहकार्याचे प्रतीक ठरेल.


या नव्या दशकात संरक्षण हे दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांचे प्रमुख स्तंभ राहील. स्वतंत्र, खुला आणि नियमाधारित हिंद-प्रशांत क्षेत्र निर्माण करण्यासाठी ही भागीदारी निर्णायक ठरेल.” गेल्या काही महिन्यांपासून भारत-अमेरिका संबंधांत काही तणाव दिसून आला होता - टॅरिफ वाद आणि रशियाकडून तेल खरेदी यावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद झाले होते. मात्र, या नव्या संरक्षण करारामुळे दोन्ही देश पुन्हा जवळ येत असल्याचे आणि परस्पर विश्वास दृढ होत असल्याचे
स्पष्ट दिसते.

Comments
Add Comment

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक