कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप महाराज यांचं शुक्रवारी पहाटे पंढरपूर येथे निधन झालं. कार्तिकी एकादशी निमित्त ते पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.


गुरुवारी रात्री ते कीर्तन करून आपल्या निवासस्थानी परतले असता त्यांना पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.


वैभववाडी तालुक्यातील आखवणे पुनर्वसन गावठण येथील रहिवासी असलेल्या नागप महाराजांनी वडिलांकडून कीर्तन परंपरेचा वारसा घेतला आणि तो अखेरपर्यंत जपला.


कीर्तनकार सोबत समाजसेवकही होते. मुंबईतील बेस्ट खात्यात अधिकारी म्हणून सेवा दिल्यानंतर निवृत्तीनंतर ते पूर्णपणे समाजकार्यात गुंतले. अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून कार्यरत राहून त्यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेकांना सानुग्रह अनुदान मिळालं. तसेच आखवणे भोम आणि नागपवाडी पुनर्वसन गावठण उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता.


शांत, संयमी, अभ्यासू आणि सेवाभावी व्यक्तिमत्व असलेल्या या कीर्तनकाराच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायात आणि वैभववाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी