Police Nameplates : 'खाकी'त 'आडनावा'ची ओळख संपणार? बीडच्या ऐतिहासिक निर्णयानंतर इतर जिल्ह्यांमध्येही स्वागत; लवकरच पोलीस नेमप्लेटवरून आडनाव 'गायब'!

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या वर्दीवरील (Police Uniform) खाकी गणवेश (Khaki Uniform) आणि त्यावर असलेली नावपट्टी ही सर्वसामान्य ओळख आहे. मात्र, आता या परंपरेत बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. बीड जिल्ह्यात पोलिसांच्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवण्याच्या निर्णयाने राज्यभरात चर्चेला सुरुवात झाली होती. आता या निर्णयाचे अनुकरण छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलातही (Chhatrapati Sambhajinagar City Police Force) होत आहे. काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवले आहे. या निर्णयाकडे नागरिक आणि प्रशासनाचे विशेष लक्ष वेधले गेले असून, या बदलामागील उद्देशांवर चर्चा सुरू आहे.



जातीयवादाच्या वादातून बीडमध्ये पोलिसांच्या वर्दीवरील आडनाव हटवण्याचा निर्णय


बीड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांच्या जातीवर आधारित यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे पोलीस विभागातही जातीय नियुक्त्यांबाबत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील तसेच कार्यालयीन नावपट्टांवरील आडनावे हटवण्याचे निर्देश दिले. हा निर्णय जातीय ओळख मिटवून पोलीस दलात समानता आणि निष्पक्षता वाढवण्याच्या उदात्त उद्देशाने घेण्यात आला. राज्यभरात या पावलाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. मात्र, दुसरीकडे केवळ आडनाव हटवल्याने जातीयवाद संपेल का, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.



पोलीस दलात 'एकजूट' वाढवण्यासाठी नावपट्टीवर केवळ नावाचा उल्लेख


बीडनंतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातही पोलीस गणवेशावरील आडनाव हटवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या निर्णयामागे कर्मचाऱ्यांमधून अनेक सकारात्मक मते व्यक्त होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते, नावपट्टीवरील आडनावावरून एखाद्या व्यक्तीची जात वा धर्म सहज ओळखता येतो. यामुळे 'आपला -परका' असा भेदभाव निर्माण होण्याची शक्यता वाढते. काही कर्मचाऱ्यांचे मत आहे की, नियुक्ती आणि बदली प्रक्रियेतही अशा जातीय ओळखीचा सूक्ष्म प्रभाव पडू शकतो. पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी (Prashant Swami) यांनी या बदलाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, "आडनावविरहित नावपट्टीचा प्रसार झाला, तर तो दलातील एकजूट आणि निष्पक्षता वाढविण्यासाठी स्वागतार्ह पाऊल ठरेल." त्यांनी स्वत: आपल्या पसंतीने नावपट्टीवरील आडनाव हटवले असून, 'आपण आपल्यापुरते पालन करतो आहोत,' असेही स्पष्ट केले.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात