महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता विश्वविजेता होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय महिला संघ विश्वविजेता झाल्यास आपण एक काम करणार असल्याचं वचन दिलं आहे. जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकला तर ते जेमिमा रॉड्रिग्जसोबत ड्युएट सादर करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे.


आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. जर भारत स्पर्धेत विजयी झाला तर आपल्याला जेमिमासोबत गाणं गाण्यास आवडेल असं गावसकरांनी सांगितलं आहे.


“जर भारताने वर्ल्डकप जिंकला तर ती आणि मी, जर तिची हरकत नसेल तर आम्ही एकत्र गाणं गाऊ. तिच्याकडे तिचं गिटार असेल आणि मी गाणं गाईन,” असं गावसकरांनी स्पोर्ट्स टुडेशी बोलताना म्हटलं. “काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या एका पुरस्कार सोहळ्यात आम्ही खरंच असं केलं होतं. तिथे एक बँड वाजत होता आणि आम्ही त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. ती गिटारवर होती आणि मी गायलो. पण जर भारत जिंकला तर मला ते पुन्हा करायला आवडेल , जर तिची हरकत नसेल. एका वृद्ध व्यक्तीसोबत तिला परफॉर्म करण्यास आवडत असेल तर मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.

Comments
Add Comment

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची