Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे. 'मोंथा' (Montha) चक्रीवादळाच्या (Cyclone) पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. वादळामुळे कोकण किनारपट्टीवर जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (Maharashtra Maritime Board) मुंबईतील मांडवा – गेटवे ऑफ इंडिया (Mandwa – Gateway of India) जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे हवामान अस्थिर झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू होता, अगदी दिवाळीचा सणही पावसातच गेला. पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी, आता मोंथा वादळामुळे परिस्थिती पुन्हा बदलली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) कोकण किनारपट्टीवर पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



'मोंथा' वादळ आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मोठा निर्णय


'मोंथा' वादळामुळे मुंबईतील समुद्र खवळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर (Weather Department Warning) प्रशासनाने तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने 'मांडवा - गेटवे ऑफ इंडिया' जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या बंदीमध्ये केवळ 'मालदार कॅप्टन' (Maldar Captain) ही बोट तात्पुरती सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे, तर इतर सर्व बोटी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने 'नंबर ३ चा इशारा' दिल्यानंतर अलिबाग, मुरुड, काशीद, रेवदंडा आणि उरण परिसरातील सर्व मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रात न नेता किनाऱ्यावरच सुरक्षित उभ्या केल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी ही मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.



कोकणातील काजू बागा संकटात; पाऊस वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता


दरम्यान, कोकण विभागात पावसाचा जोर वाढला आहे. या अवकाळी आणि सततच्या पावसाचा थेट फटका काजू बागांना बसत आहे, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सततच्या पावसामुळे काजूच्या झाडांवर बुरशीजन्य रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काही भागांत काजूचा मोहोर गळून पडला (Cashew Bloom Dropped) आहे आणि झाडे सुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणि मच्छिमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



चिपळूणमध्ये जोरदार पाऊस: भातशेतीचे मोठे नुकसान


चिपळूण (Chiplun) तालुक्यात रात्रीपासून अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी त्रेधातिरपीट उडाली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भात शेतीला बसला आहे. शेतात पाणी साठल्यामुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी कापून ठेवलेले भात पीक रस्त्यावर वाळवण्यासाठी (Drying) ठेवले होते. मात्र, रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे आणि संततधारेमुळे हे पीक पूर्णपणे ओले झाले असून, कुजायला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे इतके मोठे नुकसान झाले आहे की, आता हे भात पीक वाचवणे (Saving the Crop) हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान बनले आहे. चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला असून, ते हवालदिल झाले आहेत. या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Leopard Conflict : 'गोळी' की 'नसबंदी'? बिबट्याला पकडण्यासाठी सरकारचा मास्टरस्ट्रोक! तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च करणार अन्...

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे,

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय

पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद